IPL 2025 Retention Live : आयपीएल रिटेन्शन लाईव्ह पाहता येणार, चॅनल-अ‍ॅप, तारीख, वेळ सर्वकाही जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IPL 2025 Retention Live : आयपीएल रिटेन्शन लाईव्ह पाहता येणार, चॅनल-अ‍ॅप, तारीख, वेळ सर्वकाही जाणून घ्या

IPL 2025 Retention Live : आयपीएल रिटेन्शन लाईव्ह पाहता येणार, चॅनल-अ‍ॅप, तारीख, वेळ सर्वकाही जाणून घ्या

Published Oct 27, 2024 12:32 PM IST

IPL 2025 Retention Live Streaming : क्रिकेट चाहते त्यांचा आवडता संघ कोणते खेळाडू रिटेन करणार आणि कोणाला सोडणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशा स्थितीत आयपीएल रिटेन्शन चाहते लाइव्ह पाहू शकतात.

IPL 2025 Retention Live :  आयपीएल रिटेन्शन लाईव्ह पाहता येणार, चॅनल-अ‍ॅप, तारीख, वेळ सर्वकाही जाणून घ्या
IPL 2025 Retention Live : आयपीएल रिटेन्शन लाईव्ह पाहता येणार, चॅनल-अ‍ॅप, तारीख, वेळ सर्वकाही जाणून घ्या (ANI)

आयपीएल २०२५ साठी खेळाडूंचा मेगा लिलाव डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होऊ शकतो. पण त्याआधी आयपीएलच्या सर्वच संघाना त्यांच्या रिलीज आणि रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार आहे. ही यादी जाहीर करण्याची अंतिम तारीक ३१ ऑक्टोबर आहे. 

अशा स्थितीत ही तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतशी चाहते आणि खेळाडूंमध्ये उत्सुकता वाढत आहे. आयपीएलचे सर्व संघदेखील तयारीला अंतिम रूप देण्यात व्यस्त आहेत. 

दरम्यान, क्रिकेट चाहते त्यांचा आवडता संघ कोणते खेळाडू रिटेन करणार आणि कोणाला सोडणार हे जाणून घेण्यासाठी उत्सुक आहेत. अशा स्थितीत आयपीएल रिटेन्शन चाहते लाइव्ह पाहू शकतात.

३१ ऑक्टोबरपर्यंत रिटेन खेळाडूंची यादी जाहीर करावी लागणार

बीसीसीआयने आधीच स्पष्ट केले आहे की सर्व संघांनी पुढील वर्षीच्या इंडियन प्रीमियर लीगसाठी त्यांच्या रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी ३१ ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत सादर करावी. जेणेकरून रीलीज केलेल्या खेळाडूंना पुन्हा लिलावात समाविष्ट करता येईल.

आयपीएल रिटेन्शन लाईव्ह कधी आणि कुठे पाहणार?

आयपीएल रिटेन्शनचे लाईव्ह स्ट्रिमिंग जिओ सिनेमावर पाहू शकता. तसेच, आयपीएल रिटेन्शन टीव्हीवर स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहता येईल. या दोन्ही ठिकाणी ३१ ऑक्टोबर रोजी दुपारी ४:३० वाजेपासून थेट प्रक्षेपण सुरू होणार आहे. 

तसेच, यावेळी संघ ६ खेळाडूंना रिटेन करू शकतात. यात ५ कॅप्ड आणि एक अनकॅप्ड खेळाडू असावेत.

अशा परिस्थितीत कोणता संघ आपल्या किती खेळाडूंना रिटेन करतो, हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. या वेळी सर्वाधिक लक्ष नवीन आणि युवा खेळाडूंवर असेल, जे गेल्या काही वर्षांत चांगली कामगिरी करत आहेत. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या