भारतीय क्रिकेट संघाने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०२४ चा टी-20 विश्वचषक जिंकला. भारताने विजेतेपदाच्या लढतीत दक्षिण आफ्रिकेचा ७ धावांनी पराभव केला. हा ९ वा टी-20 विश्वचषक होता. यासोबतच चाहत्यांना आता पुढील टी-२० विश्वचषक कधी खेळवला जाईल हे जाणून घ्यायचे आहे. आता पुढील टी-विश्वचषक कधी होणार आहे, याची माहिती येथे जाणून घेऊ.
पुढचा T20 वर्ल्ड कप २०२६ मध्ये खेळवला जाणार आहे. ICC ने २०२६ च्या T20 विश्वचषकासाठी फेब्रुवारी ते मार्चची विंडो दिली आहे. या विश्वचषकातही एकूण २० संघ सहभागी होणार आहेत.
पुढील विश्वचषक म्हणजेच २०२६ चा टी-20 विश्वचषक भारत आणि श्रीलंकेत खेळवला जाईल. दोन्ही देश संयुक्तपणे याचे आयोजन करणार आहेत. २०२४ T20 विश्वचषकातील सुपर-८ संघ २०२६ च्या T20 विश्वचषकासाठी पात्र ठरले आहेत.
यजमान असल्यामुळे भारत आणि श्रीलंका वर्ल्डकपचा भाग असतील. २०२६ टी-२० विश्वचषकातील बहुतांश सामने भारतात खेळवले जातील. या जागतिक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचा संघही भारतात येणार आहे.
T20 विश्वचषक २०२६ भारत आणि श्रीलंकेमध्ये आयोजित केला जाणार आहे. हा वर्ल्डकप फेब्रुवारीमध्ये सुरू होऊ शकते. T20 विश्वचषक स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी होणार आहेत. यामध्ये १२ जण पात्र ठरले आहेत.
तर ८ संघ पात्रता फेरीतून येतील. २० संघांमध्ये एकूण ५५ सामने खेळवले जाणार आहेत. अजून वेळापत्रक जाहीर झालेले नाही.
भारत, श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, बांगलादेश, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, यूएसए, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड आणि पाकिस्तान.