भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीची विचार करण्याची आणि सहकारी क्रिकेटपटूंना शिकवण्याची पद्धत खूपच वेगळी आहे. आता काही काळापूर्वी भारतासाठी पदार्पण करणाऱ्या तुषार देशपांडे याने धोनीशी संबंधित एक रंजक किस्सा शेअर केला आहे.
तुषार देशपांडे २०२२ मध्ये CSK मध्ये सामील झाला, परंतु तो २०२३ मध्ये त्याला संपूर्ण हंगाम खेळायची संधी मिळाली. २०२३ च्या आयपीएल हंगामात देशपांडेची सुरुवात खूपच खराब झाली होती.
कारण गुजरात जायंट्स विरुद्धच्या सामन्यात त्याने ३.२ षटकात ५१ धावा खाल्ल्या होत्या आणि तो फक्त एक विकेट घेऊ शकला होता. मात्र या खराब कामगिरीनंतरही सीएसकेचा तत्कालीन कर्णधार धोनीने त्याला साथ दिली.
एमएस धोनीने नेहमी विश्वास दाखवला
गुजरातविरुद्धच्या सामन्यात झालेल्या जोरदार धुलाईनंतर तुषार देशपांडे म्हणाला की, धोनी त्याच्याकडे आला आणि म्हणाला, 'तु कोणतीही चूक केली नाही, तुचे सर्व चेंडू चांगले होते. मुद्दा असा की आज तुझा दिवस नव्हता. पुढच्या सामन्यात अशीच गोलंदाजी कर."
यानंतर धोनीने नेटमध्ये देशपांडेच्या गोलंदाजीवर फलंदाजी केली. त्या सत्राची आठवण करून देताना युवा गोलंदाज तुषार म्हणाला, "मी चांगला यॉर्कर बॉल टाकत होतो, पण अचानक मी एक बाउन्सर बॉल टाकला, ज्यावर धोनीने १०० मीटर लांब सिक्स मारला.
यानंतर धोनीने मला संतापून विचारले, 'तू बाऊन्सर का टाकलास?' यावर मी (तुषार) म्हणालो वाटले की तु यॉर्करची अपेक्षा करत असशील, त्यामुळे मी बदल म्हणून यॉर्कर टाकला.
या उत्तरावर धोनीने मला सांगितले, की तु तुझ्या मनात क्रिकेट खेळू नकोस. तु यॉर्कर टाक, कोणीही तुझा चेंडू मारू शकणार नाही. याशिवाय त्याने मला फिटनेसवरही काम करण्यास सांगितले".