LBW होणारा पहिला भारतीय फलंदाज कोण? क्रिकेटमध्ये LBW नियम कधी सुरू झाला? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LBW होणारा पहिला भारतीय फलंदाज कोण? क्रिकेटमध्ये LBW नियम कधी सुरू झाला? जाणून घ्या

LBW होणारा पहिला भारतीय फलंदाज कोण? क्रिकेटमध्ये LBW नियम कधी सुरू झाला? जाणून घ्या

Published Sep 01, 2024 04:29 PM IST

क्रिकेटमध्ये 'एलबीडब्ल्यू' (LBW) नावाचा एक नियम आहे, ज्याला लेग बिफोर विकेट असेही म्हणतात. हा नियम फार जुना आहे.

LBW होणारा पहिला भारतीय फलंदाज कोण? क्रिकेटमध्ये LBW नियम कधी सुरू झाला? जाणून घ्या
LBW होणारा पहिला भारतीय फलंदाज कोण? क्रिकेटमध्ये LBW नियम कधी सुरू झाला? जाणून घ्या

क्रिकेटचा खेळ खूप जुना आहे. या खेळाने काळानुरूप नवे बदलही घडवून आणले आहेत. तसेच, सध्याच्या काळात क्रिकेटमध्ये अनेक बदल झाले आहेत. आधी फक्त कसोटी फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले जायचे, त्यानंतर एकदिवसीय सामन्यांचा उदय झाला. आता टी-20 क्रिकेट प्रचंड लोकप्रिय आहे.

तसेच, अनेक देशांमध्ये १०० चेंडूंचे आणि ६० चेंडूचेही सामनेही खेळले जात आहे. म्हणजेच, क्रिकेट प्रचंड वेगाने बदलत आहे. तसेच, क्रिकेटमध्ये नव नवीन नियमांनाही स्थान मिळत आहे.

पण क्रिकेटमध्ये 'एलबीडब्ल्यू' (LBW) नावाचा एक नियम आहे, ज्याला लेग बिफोर विकेट असेही म्हणतात. हा नियम फार जुना आहे.

एलबीडब्ल्यू समजणे खूप कठीण काम आहे. या नियमात जर चेंडू फलंदाजाच्या शरिराच्या कोणत्याही भागावर आदळला आणि त्यावेळी फलंदाज जर स्टंपच्या अगदी समोर असेल, तर त्याला लेग बिफोर विकेट घोषित करण्यात येते.

LBW नियम कधी सुरू झाला?

खरं तर, १८ व्या शतकात, फलंदाज बाद होऊ नये म्हणून अनेकदा पायांनी चेंडू अडवू लागले. या कारणास्तव, १७७४ मध्ये प्रथमच यासाठी एक नियम करण्यात आला. जर चेंडू स्टंपसमोर पायावर किंवा पॅडवर आदळला तर फलंदाजाला आऊट देण्यात आले.

नियमातील बदल आणि सुधारणा दीर्घकाळ चालू राहिल्या, परंतु १९३५ मध्ये एलबीडब्ल्यू नियमात एक नवीन पैलू जोडला गेला. नवीन नियमानुसार, चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर पीच झाला असेल आणि फलंदाज स्टंपसमोर असेल तरी त्याला बाद घोषित केले जाईल.

अशा परिस्थितीत लेग स्पिन गोलंदाजांचे समर्थन करणाऱ्या लोकांनी या नियमाला विरोध केला. अनेक दशकांच्या विरोधानंतर, १९७२ मध्ये नियमात एक नवीन पैलू जोडला गेला. या अंतर्गत, जर एखादा फलंदाज शॉट न खेळण्याच्या उद्देशाने आपली बॅट मागे ठेवत असेल, आणि चेंडू लेग स्टंपच्या बाहेर पडला असेल तरी त्याला आऊट देण्याचा नियम झाल.

परंतु सध्याच्या नियमांनुसार, जर फलंदाज क्रीझपासून ३ मीटर किंवा त्याहून अधिक अंतरावर पुढे गेला, आणि चेंडू पॅडवर किंवा शरीरावर आदळला तर त्याला आऊट देता येत नाही.

LBW बाद होणारा पहिला फलंदाज कोण?

एलबीडब्ल्यू नियमानुसार बाद होणारा पहिला फलंदाज हॅरी कॉर्नर होता. १९०० च्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत इंग्लंडचा संघ फ्रान्सविरुद्ध खेळत होता. त्या सामन्यात इंग्लिश फलंदाज कॉर्नरला फ्रान्सच्या डब्ल्यू अँडरसनने बाद केले.

तर LBW नियमानुसार बाद होणारा पहिला भारतीय फलंदाज नौमल जिओमल होता, ज्याला १९३२ मध्ये इंग्लंडच्या वॉल्टर रॉबिन्सने बाद केले होते.

Whats_app_banner

संबंधित बातम्या