Virender Sehwag : सेहवागने पत्नी आरतीसोबतच्या शेवटच्या इन्स्टा पोस्टमध्ये काय लिहिलं होतं? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virender Sehwag : सेहवागने पत्नी आरतीसोबतच्या शेवटच्या इन्स्टा पोस्टमध्ये काय लिहिलं होतं? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

Virender Sehwag : सेहवागने पत्नी आरतीसोबतच्या शेवटच्या इन्स्टा पोस्टमध्ये काय लिहिलं होतं? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

Jan 24, 2025 10:33 AM IST

Virender Sehwag Aarti Ahlawat : भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाबाबत अफवा पसरल्या आहेत. सेहवागने १९ महिन्यांपूर्वी पत्नी आरतीसोबतची शेवटची पोस्ट शेअर केली होती.

Virender Sehwag : सेहवाहगची पत्नी आरतीसोबतची शेवटची इन्स्टा पोस्ट काय होती? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण
Virender Sehwag : सेहवाहगची पत्नी आरतीसोबतची शेवटची इन्स्टा पोस्ट काय होती? घटस्फोटाच्या चर्चांना उधाण

Virender Sehwag Last Post With Wife Aarti Ahlawat : टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि फलंदाज मनीष पांडे यांच्या घटस्फोटाच्या अफवा चर्चेत आहेत.या दरम्यानन, आता टीम इंडियाचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग याच्या घटस्फोटांच्या चर्चांनाही उधाण आले आहे.

चहल पत्नी धनश्री वर्मापासून वेगळा होणार असल्याचे बोलले जात आहे. तर मनीष पांडे हा त्याची पत्नी अश्रिता शेट्टीपासून वेगळे राहत असल्याची माहिती आहे.

अशातच आता सेहवाग आणि आरती अहलावबाबत एक धक्कादायक खुलासा झाला आहे. वस्तुस्थिती अशी आहे की, सेहवागने पत्नी आरतीसोबत गेल्या १९ महिन्यांपासून इंस्टाग्रामवर कोणतीही पोस्ट शेअर केलेली नाही.

विशेष म्हणजे, याआधी सेहवाग अनेकदा त्याची पत्नी आरतीसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असे, मात्र गेल्या १९ महिन्यांपूर्वी त्याने पत्नीसोबतचा एकही फोटो शेअर केलेला नाही.

पत्नी आरतीसोबत सेहवागची शेवटची पोस्ट

सेहवागने २८ एप्रिल २०२३ रोजी पत्नी आरतीसोबत इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. हा फोटो दुबईचा होता. या फोटोला कॅप्शन देताना सेहवागने लिहिले होते की, "जगणं आणि स्वप्नांच्या दरम्यान कुठेतरी."

सेहवाग आणि आरती घटस्फोट घेणार?

सेहवाग आणि आरतीने इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केल्याचे सांगितले जात आहे. सेहवागच्या कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी सांगितले की, सेहवाग आणि आरती गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. याशिवाय दोघेही लवकरच एकमेकांना घटस्फोट देऊ शकतात.

गेल्या वर्षी सेहवागने दिवाळीचे फोटो शेअर केले होते, ज्यामध्ये त्याची आई आणि मुलगा दिसत होते, मात्र पत्नी आरती या फोटोंमधून गायब होती. यानंतर त्यांच्या विभक्त होण्याच्या अफवांनी जोर धरला होता.

सेहवाग आणि आरती यांचे २००४ मध्ये लग्न

सेहवाग आणि आरती अहलावत यांनी २००४ मध्ये लग्न केले होते. दोघांना दोन मुले आहेत. मोठ्या मुलाचे नाव आर्यवीर आणि धाकट्या मुलाचे नाव वेदांत आहे. सध्या दोघेही दिल्लीकडून वयोगटातील क्रिकेट खेळत आहेत.

Whats_app_banner

संबंधित बातम्या