भारताची लोकसंख्या १४० कोटींहून अधिक आहे आणि देशातील बहुसंख्य मुलांना क्रिकेटपटू बनायचे आहे. अशा स्थितीत युवा क्रिकेटपटूंसाठी राष्ट्रीय संघापर्यंत पोहोचण्याचा मार्ग खूप कठीण आहे. बहुतेक खेळाडू गरीबी आणि कठीण परिस्थितीतून संघर्ष करत टीम इंडियात पोहोचतात.
तसेच, या खेळात सातत्याने सुधारणा होत आहे. तसेच, या क्रिकेटचे साहित्यदेखील खूप महागडे आहे. आजचे बॅट्स पूर्वीच्या बॅट्सपेक्षा खूप वेगळे आहेत, तसेच, बॅट्समनला स्वतःचा बचाव करण्यासाठी बरीच साधने वापरावी लागतात.
पण पूर्वी क्रिकेट हा खेळ फार कमी सुविधांमध्ये खेळला जायचा. विशेषत: जर आपण शूजबद्दल बोललो तर, आज गोलंदाजांच्या आणि फिल्डर्सच्या शूजमध्ये मोठे स्पाइक असतात, ज्यामुळे त्यांना रनअप घेणे आणि धावणे सोपे होते. पण क्रिकेटपटू वापर असलेल्या शूजची किंमत किती असते? हे तुम्हाला माहिती आहे का?
SG ही कंपनी भारतातील सर्वात प्रसिद्ध क्रीडा वस्तू उत्पादकांपैकी एक आहे. भारतात खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यांमध्ये या कंपनीचे लेदर बॉल वापरले जातात. शूजबद्दल बोलायचे झाल्यास, एसजीच्या अधिकृत वेबसाइटवर स्पाइक असलेल्या शूजची किंमत २००० ते ३००० रुपयांदरम्यान आहे. शूजच्या गुणवत्तेनुसार, ही किंमत आणखी वाढू शकते. तर Adidas आणि Puma सारख्या कंपन्या १०-२० हजार रुपयांमध्ये प्रोफेशनल क्रिकेट शूज विकतात.
विराट कोहली सध्या जगातील सर्वोत्तम, श्रीमंत आणि लोकप्रिय खेळाडूंपैकी एक आहे. तो स्वतः एक ब्रँड बनला आहे आणि त्याची एकूण संपत्ती १००० कोटींहून अधिक आहे.
विराट कोहली जागतिक क्रीडा कंपनी प्यूमाचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे आणि हीच कंपनी त्याच्यासाठी शूज बनवते. DSC या भारतीय स्पोर्ट्स कंपनीच्या मते, विराटच्या बुटांची किंमत २०-३० हजारांच्या दरम्यान आहे.
क्रिकेटपटू स्पाइक्सशिवाय खेळू शकत नाहीत, असे नाही. पण फरक असा आहे की स्पाइक्स लावल्याने, फलंदाज असो वा गोलंदाज, त्याच्या शूजला चांगली पकड मिळते, ज्यामुळे त्यांना गवतावर न घसरता धावणे सोपे जाते. सामान्य शूजमध्येही स्पाइक बसवता येतात.