पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकने अभिनेत्री सना जावेदसोबत लग्न केले आहे. शोएब आणि सना या दोघांनीही सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून ही माहिती दिली. यानंतर या लग्नाची बरीच चर्चा रंगली आहे.
वास्तविक, शोएब आणि त्याची दुसरी पत्नी सानिया मिर्झा यांच्यात गेल्या काही काळापासून काहीच अलबेल नव्हते. तसेच, दोघांचा घटस्फोट झाल्याच्या बातम्याही येत होत्या. अशात आता शोएबने सना जावेदसोबत लग्न करून सर्वकाही स्पष्ट केले आहे.
शोएब मलिकच्या तिसर्या लग्नाने सगळेच हैराण झाले आहेत. सानिया मिर्झाचे वडील इम्रान मिर्झा यांनीही शोएब मलिकच्या लग्नावर वक्तव्य केले होते. तो ‘खुला’ असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता खुला हा शब्द ऐकून तुमच्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की खुला म्हणजे आहे?
वास्तविक, मुस्लिमांमध्ये तलाक हा पुरुष देतात तर खुला महिला देतात. 'खुला' हा इस्लाममध्ये महिलांना दिलेला अधिकार आहे. यामुळे महिलांना घटस्फोट घेण्याचा पर्याय उपलब्ध होते. सोप्या भाषेत, खुला म्हणजे मुस्लिम महिला आपल्या पतीला एकतर्फी घटस्फोट देऊ शकतात. हा त्यांचा हक्क आहे. घटस्फोटानंतर मुलांचे शिक्षण आणि आर्थिक पाठबळ देण्याची जबाबदारी पतीची असते.
पती-पत्नी विभक्त झाल्यानंतर, मुले सामान्यतः "हिजनत" वयापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांच्या आईकडे राहतात. मुलांसाठी हे वय ७ वर्षे आहे, तर मुलींसाठी, ती तारुण्यात येईपर्यंत आहे.
तर तलाक म्हणजे पुरूष जेव्हा घटस्फोट देतात त्याला तलाक म्हणतात. यामध्ये पत्नीची संमती आवश्यक नाही. तलाकच्या तीन महिन्यानंतर महिला पुन्हा लग्न करू शकते.