सचिन तेंडुलकरची संपत्ती १२०० कोटी रुपये, पण मुलगा अर्जुनची IPL लिलावातील बेस प्राईस किती?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  सचिन तेंडुलकरची संपत्ती १२०० कोटी रुपये, पण मुलगा अर्जुनची IPL लिलावातील बेस प्राईस किती?

सचिन तेंडुलकरची संपत्ती १२०० कोटी रुपये, पण मुलगा अर्जुनची IPL लिलावातील बेस प्राईस किती?

Nov 17, 2024 05:54 PM IST

Arjun Tendulkar IPL 2025 Base Price : इंडियन प्रीमियर लीग २०२५ साठीचा मेगा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह शहरात होणार आहे. या मेगा लिलावात २०० हून अधिक खेळाडूंच्या भवितव्याचा फैसला होणार असून त्यात अर्जुन तेंडुलकरच्या नावाचाही समावेश आहे.

Arjun Tendulkar IPL 2025 Base Price : सचिन तेंडुलकरची संपत्ती १२०० कोटी रुपये, पण मुलगा अर्जुनची IPL लिलावातील बेस प्राईस किती?
Arjun Tendulkar IPL 2025 Base Price : सचिन तेंडुलकरची संपत्ती १२०० कोटी रुपये, पण मुलगा अर्जुनची IPL लिलावातील बेस प्राईस किती? (AFP)

इंडियन प्रीमियर लीग २०२५ च्या मेगा लिलावाची तयारी पूर्ण झाली आहे. वेळ आणि ठिकाण ठरले आहे. आयपीएल मेगा लिलावासाठी भारत आणि परदेशातील एकूण १५७४ खेळाडूंनी नोंदणी केली होती. यातून ५७४ खेळाडूंची निवड करण्यात आली.

तथापि, या ५७४ खेळाडूंपैकी केवळ २०४ खेळाडू खरेदी केले जातील, ज्यामध्ये महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या नावाचाही समावेश आहे.

अर्जुन तेंडुलकर गेल्या मोसमात मुंबई इंडियन्स संघात होता. अर्जुनला २०२३ साली मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. मात्र, यावेळी फ्रँचायझीने त्याला रिटेन केलेले नाही. मात्र मेगा लिलावात अर्जुन तेंडुलकरवर बोली लावण्याचा प्रयत्न मुंबई संघ नक्कीच करेल, अशी शक्यता आहे.

परंतु यावेळी त्याची किंमत लक्षणीय वाढू शकते. अशा परिस्थितीत अर्जुनच्या मेगा लिलावासाठी बेस प्राईस काय आहे ते जाणून घेऊया.

वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमध्ये आपली कारकीर्द यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये गोव्याकडून खेळणाऱ्या अर्जुनने प्रथमच आपला पंजा उघडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

अर्जुनसोबत महान सचिन तेंडुलकरचे नाव जोडले गेल्याने चाहत्यांच्याही त्याच्याकडून खूप अपेक्षा आहेत, मात्र अपेक्षांचे ओझे असतानाही अर्जुन आपल्या कारकिर्दीला चालना देण्यात कोणतीही कसर सोडत नाही.

यावेळी आयपीएलच्या मेगा लिलावात त्याच्यावर मोठी बोली लावली जाण्याची शक्यता आहे. अर्जुनचे वडील भारतातील सर्वात श्रीमंत क्रिकेटपटूंपैकी एक आहेत. सचिन तेंडुलकरची एकूण संपत्ती १२५० कोटींहून अधिक असल्याचा अंदाज आहे, मात्र त्याचा मुलगा अर्जुन या मेगा लिलावात केवळ ३० लाख रुपयांच्या मूळ किमतीत लिलाव होणार आहे. गेल्या मोसमातही अर्जुनला मुंबई इंडियन्सकडून ३० लाख रुपये मिळाले होते.

 

Whats_app_banner