मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 WC 2024 : १ जून की २ जून… टी-20 वर्ल्डकपचा पहिला सामना नेमका कधी? तारखेचा गोंधळ का होतोय? वाचा

T20 WC 2024 : १ जून की २ जून… टी-20 वर्ल्डकपचा पहिला सामना नेमका कधी? तारखेचा गोंधळ का होतोय? वाचा

May 31, 2024 03:39 PM IST

T20 World Cup 2024 Start Date : विश्वचषक स्पर्धा १ जूनपासून सुरू होत आहे की २ जूनपासून? तुमचाही गोंधळ होत आहे ना? भारतीय आणि अमेरिकन वेळेने टी-20 वर्ल्डकपच्या वेळापत्रकात कसा गोंधळ निर्माण केला आहे ते जाणून घ्या.

T20 WC 2024 : १ जून की २ जून… टी-20 वर्ल्डकपचा पहिला सामना नेमका कधी? तारखेचा गोंधळ का होतोय? वाचा
T20 WC 2024 : १ जून की २ जून… टी-20 वर्ल्डकपचा पहिला सामना नेमका कधी? तारखेचा गोंधळ का होतोय? वाचा

T20 World Cup 2024 : T20 World Cup 2024 Match Timing : टी-20 वर्ल्डकप २०२४ साठी भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसह २० संघ सज्ज झाले आहेत. यावेळी वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टी-20 वर्ल्डकपचे १६ सामने यूएसएमध्ये खेळले जाणार आहेत, तर उर्वरित ३९ सामने कॅरेबियन बेटांवर खेळले जातील.

ट्रेंडिंग न्यूज

पण सध्या टी-20 विश्वचषक स्पर्धा १ जूनपासून सुरू होणार की २ जून? असा संभ्रम निर्माण झाला आहे. विशेषत: भारतीय चाहत्यांसाठी, सामने कोणत्या वेळी लाईव्ह पाहू शकतील हे समजणे खूप कठीण होत आहे.

नेमका गोंधळ का होत आहे?

वास्तविक, पृथ्वीचा मध्य भाग मानल्या जाणाऱ्या ग्रीनविच नावाच्या ठिकाणावरून पृथ्वीवरील वेळ मोजली जाते. ग्रीनविचनुसार वेळ जाणून घेण्यासाठी GMT मानक वापरला जातो. ग्रीनविचच्या तुलनेत अमेरिका पश्चिमेला असल्याने तेथे सूर्य उशिरा उगवतो. ग्रीनविचमुळे भारताची गणना पूर्वेकडील देशांमध्ये केली जाते.

यामुळेच अमेरिकेची घड्याळे भारताच्या तुलनेत साडेनऊ तास उशिराने चालतात. यावरून तुम्हाला थोडीशी कल्पना आली असेल की हा वेळेतील फरक हाच वेळापत्रकाच्या संदर्भात गोंधळ निर्माण करत आहे.

अमेरिकेत १ जून तर भारतात २ जूनला वर्ल्डकप सुरू होणार

आयसीसीने जाहीर केलेले वेळापत्रक अमेरिकन वेळेनुसार तयार करण्यात आलेले नाही, त्यामुळे आयसीसीच्या अधिकृत वेबसाइटवर पहिला सामना २ जून रोजी होणार आहे. पण अमेरिकेत टी-20 विश्वचषक स्पर्धा १ जूनपासून सुरू होणार असून पहिला सामना अमेरिका आणि कॅनडा यांच्यात टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर होणार आहे.

यूएसए विरुद्ध कॅनडा सामन्याचे उदाहरण घेता, तो २ जून रोजी भारतीय वेळेनुसार सकाळी ६ वाजता सुरू होईल. पण अमेरिकेत १ जूनला रात्रीचे ८:३० वाजले असतील. त्यामुळे व्यावहारिकदृष्ट्या भारतात २ जूनपासून विश्वचषकाला सुरुवात होणार असली तरी पहिला सामना १ जूनला अमेरिकेत होणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४