मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  एका षटकार मारताच ६ घरांना सौरऊर्जा देणार, राजस्थान रॉयल्सचं पिंक प्रॉमिस आहे तरी काय? पाहा

एका षटकार मारताच ६ घरांना सौरऊर्जा देणार, राजस्थान रॉयल्सचं पिंक प्रॉमिस आहे तरी काय? पाहा

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 06, 2024 07:52 PM IST

what is rajasthan royals pink promise : आज आयपीएलमध्ये राजस्थान आणि आरसीबी आमनेसामने आहेत. या सामन्यातील प्रत्येक षटकारामागे राजस्थान रॉयल्स फ्रेंचायझीने ६ घरांना सौर उर्जा प्रदान करण्याचे वचन दिले आहे.

what is rajasthan royals pink promise राजस्थान रॉयल्सचं पिंक प्रॉमिस आहे तरी काय? पाहा
what is rajasthan royals pink promise राजस्थान रॉयल्सचं पिंक प्रॉमिस आहे तरी काय? पाहा

Rajasthan Royals pink promise : इंडियन प्रीमियर लीग २०२४ च्या १९ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसोबत (RCB) सोबत होत आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. या सामन्यात राजस्थानने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. 

ट्रेंडिंग न्यूज

दरम्यान, या सामन्यात राजस्थान रॉयल्सचे खेळाडू वेगळ्याच जर्सीत पाहायला मिळाले. संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स पूर्ण गुलाबी रंगाच्या जर्सीत मैदानावर उतरली आहे. या मागचे कारण काय हे आपण येथे जाणून घेणार आहोत.

विशेष म्हणजे, या सामन्यापूर्वीच राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने एक मोठी घोषणा केली होती. महिलांच्या नेतृत्वाखालील बदलांना प्रोत्साहन आणि समर्थन देण्याच्या मुख्य उद्देशाने राजस्थान रॉयल्सने पिंक प्रॉमिस (PinkPromise) मोहीम सुरू केली आहे. 'औरत है तो भारत है' असे या पिंक प्रॉमिस मोहिमेचे घोषवाक्य आहे. या मोहिमेअंतर्गत आजच्या सामन्यादरम्यान दोन्ही संघांच्या प्रत्येक षटकारामागे ६ घरांना सौरऊर्जा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.

राजस्थान रॉयल्स फ्रँचायझीने आरसीबीविरुद्धच्या सामन्यापूर्वी विशेष अशी पिंक जर्सी लाँच केली. ही जर्सी पिंक प्रॉमिस मोहिमेचा एक भाग आहे. सोबतच मॅच डे पिंक जर्सी विक्रीतून मिळालेली सर्व रक्कमदेखील फाउंडेशनला दान केली जाईल.

राजस्थान रॉयल्स जबरदस्त फॉर्मात

यंदाच्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स जबरदस्त कामगिरी करत आहे. राजस्थान रॉयल्स पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यांनी आतापर्यंत तीन सामने खेळले असून सर्व सामने जिंकले आहेत. 

त्याच वेळी, बेंगळुरू संघाने ४ पैकी फक्त १ सामना जिंकला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स यांच्यातील हेड टू हेड रेकॉर्डबद्दल बोलायचे तर, दोन्ही संघ आतापर्यंत एकूण ३० वेळा आमनेसामने आले आहेत. या ३० सामन्यांमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १५ वेळा विजय मिळवला आहे. त्याचबरोबर राजस्थान रॉयल्स संघाने १२ वेळा विजय मिळवला आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, नांद्रे बर्गर, युझवेंद्र चहल.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरॉन ग्रीन, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), सौरव चौहान, रीस टोपले, मयंक डागर, मोहम्मद सिराज, यश दयाल.

IPL_Entry_Point