ICC Pitch Demerit Points Rule : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरी कसोटी केवळ दीड दिवसांत संपली. हा सामना केपटाऊनच्या न्यू लॅड्स मैदानावर खेळली गेली. कसोटी सामना दीड दिवसात संपल्यानंतर अनेक दिग्गजांनी केपटाउनच्या खेळपट्टीवर आणि आफ्रिकन क्रिकेट मॅनेजमेंटवर टीका केली.
आता आयसीसीनेही न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर कारवाई केली आहे. तसेच, या खेळपट्टीचे वर्णन असमाधानकारक' असे केले आहे. हा निर्णय आयसीसीच्या खेळपट्टी आणि आउटफिल्ड निरीक्षण प्रक्रियेअंतर्गत घेण्यात आला आहे.
या मैदानावरील भारत-आफ्रिका कसोटीत केवळ ६४२ चेंडूंचा खेळ झाला. या खेळपट्टीला एक डिमेरिट पॉइंट देण्यात आला आहे.
पण, जर एखाद्या मैदानाला ६ डिमेरिट गुण मिळाले तर पुढील १२ महिने न्यूलँड्सवर कोणतेही आंतरराष्ट्रीय सामने खेळवले जाणार नाहीत. जर १२ डिमेरिट पॉइंट असतील तर २४ महिन्यांसाठी त्या मैदानावर सामना खेळवता येत नाही. हे गुण ५ वर्षांच्या कालावधीपर्यंत आहेत.
या सामन्याचे मॅच रेफ्री ख्रिस ब्रॉड यांनी आयसीसीला सादर केलेल्या आपल्या अहवालात लिहिले आहे की, न्यूलँड्सची खेळपट्टी अतिशय कठीण होती. चेंडू वेगाने उसळत होता आणि शॉट्स खेळणे कठीण होते. अनेकदा चेंडू फलंदाजांच्या ग्लोव्हजवर आदळले आणि अशा असमान उसळीमुळे अनेक विकेट पडल्या'.
खुप छान
चांगले
सरासरी
सरासरीपेक्षा कमी
वाईट
अपात्र
दोन देशांदरम्यान खेळल्या जाणार्या प्रत्येक कसोटी, वनडे आणि T-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी ICC खेळपट्टी आणि आउटफिल्डच्या कामगिरीवर रेटिंग देते.
सामना संपल्यानंतर, मॅच रेफरी खेळपट्टी आणि आऊटफिल्डवर रेटिंग देतात. हे रेटिंग पुढील आंतरराष्ट्रीय सामन्याच्या तयारीसाठी फीडबॅक म्हणून काम करते.
एखाद्या खेळपट्टीला किंवा आउटफिल्डला सरासरी किंवा खराब रेटिंग मिळाल्यास, संबंधित क्रिकेट बोर्डाला याची कारणे द्यावी लागतात. खेळपट्टी किंवा आऊटफील्डला खराब किंवा अयोग्य रेटिंग मिळाल्यास ते निकृष्ट मानले जाते. याच्या पुनरावृत्तीवर आयसीसी संबंधित मैदानावर बंदी घालू शकते.
सरासरीपेक्षा कमी रेटिंग मिळाल्यास डिमेरिट गुण दिले जातात. सरासरीपेक्षा कमी खेळपट्टीसाठी १ डिमेरिट पॉइंट, खराब पिचसाठी ३ डिमेरिट पॉइंट, खराब आऊटफिल्डसाठी २ डिमेरिट पॉइंट दिले जातात.
जर खेळपट्टी आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी अयोग्य मानली गेली, तर खेळपट्टीला ५ डिमेरिट गुण आणि आऊटफिल्डला ५ डिमेरिट गुण मिळतात. डिमेरिट पॉइंट ५ वर्षांसाठी वैध राहतात. यजमान मैदानाला पिचिंग आणि आऊटफिल्डसाठी ५ किंवा त्याहून अधिक डिमेरिट पॉइंट्स मिळाल्यास, १ वर्षासाठी निलंबन लादले जाते. त्या खेळपट्टीवर वर्षभरात एकही आंतरराष्ट्रीय सामना होऊ शकत नाही.