Follow On Rule : टेस्ट क्रिकेटमधील फॉलो-ऑन म्हणजे काय, हा नियम कधी लागू होतो? सोप्या भाषेत जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Follow On Rule : टेस्ट क्रिकेटमधील फॉलो-ऑन म्हणजे काय, हा नियम कधी लागू होतो? सोप्या भाषेत जाणून घ्या

Follow On Rule : टेस्ट क्रिकेटमधील फॉलो-ऑन म्हणजे काय, हा नियम कधी लागू होतो? सोप्या भाषेत जाणून घ्या

Dec 17, 2024 02:18 PM IST

Follow On Rule Test Cricket : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ब्रिस्बेन येथे कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यावर सध्या ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड आहे.

Follow On Rule : टेस्ट क्रिकेटमध्ये फॉलो-ऑन म्हणजे काय, हा नियम कधी लागू होते? सोप्या भाषेत जाणून घ्या
Follow On Rule : टेस्ट क्रिकेटमध्ये फॉलो-ऑन म्हणजे काय, हा नियम कधी लागू होते? सोप्या भाषेत जाणून घ्या (AFP)

What Is Follow On Rule : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा कसोटीचा आज मंगळवारी (१७ डिसेंबर) चौथा दिवस आहे. सामन्याच्या पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाची फलंदाजी सुरू असून सध्या रविंद्र जडेजा आणि नितीश रेड्डी खेळत आहेत.

दरम्यान, या सामन्यात सतत पावसाचा व्यत्यय येत आहे. त्यामुळे वारंवार सामना थांबवावा लागत आहे. भारत अद्यापही पहिल्या डावातील ऑस्ट्रेलियाच्या ४४५ धावांपेक्षा २६० धावांनी मागे आहे. रवींद्र जडेजा अर्धशतक करून खेळत आहे.

कसोटी क्रिकेटमधील फॉलोऑन नियम जाणून घ्या?

सध्या कसोटी सामन्यावर ऑस्ट्रेलियाची पकड आहे. ऑस्ट्रेलियाने भारताला फॉलो ऑन दिले आहे. भारतीय संघाने किमान पहिल्या डावात फॉलोऑन वाचवणे महत्त्वाचे आहे. जर तो फॉलोऑन वाचवू शकला नाही तर सामना टीम इंडियाच्या हातातून निसटू शकतो. अशातच आता फॉलो ऑन नेमके काय आहे ते आपण येथे जाणून घेणार आहोत.

फॉलोऑन म्हणजे काय?- फॉलोऑन हा कसोटी क्रिकेटमध्ये ऐच्छिक नियम आहे. यामध्ये, दुसऱ्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाला विरोधी संघाकडून पहिल्या डावानंतर लगेचच दुसरा डाव खेळण्यास सांगितले जाऊ शकते.

पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाकडे २०० किंवा त्याहून अधिक धावांची आघाडी असते, तेव्हा दुसऱ्या संघाला फॉलोऑन दिला जातो. हे फक्त पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या संघाच्या कर्णधारावर अवलंबून असते.

फॉलोऑन का घेतात?- कसोटी क्रिकेटमध्ये सामन्याचा निकाल मिळविण्यासाठी किमान ३ डाव आवश्यक असतात. अशा परिस्थितीत सामना अनिर्णित होण्यापासून वाचवण्यासाठी हा नियम अनेक वेळा उपयोगी पडतो. म्हणजेच, लागू करण्यामागे एकच उद्देश असतो की सामन्याचा निकाल निर्धारित वेळेत मिळावा.

भारत-ऑस्ट्रेलिया गाबा कसोटीत भारताला फॉलोऑन वाचवणयासाठी २४६ धावा करणे आवश्यक आहे. जर भारत फॉलोऑन वाचवण्यात अपयशी ठरला म्हणजे २४६ धावा केल्या नाही तर ऑस्ट्रेलियाकडे किमान २०० धावांची आघाडी असेल.

Whats_app_banner

संबंधित बातम्या