SA vs AFG: : 'चोकर्स' या शब्दाचा नेमका अर्थ काय? दक्षिण आफ्रिकेवर कसा बसला याचा शिक्का? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  SA vs AFG: : 'चोकर्स' या शब्दाचा नेमका अर्थ काय? दक्षिण आफ्रिकेवर कसा बसला याचा शिक्का? जाणून घ्या

SA vs AFG: : 'चोकर्स' या शब्दाचा नेमका अर्थ काय? दक्षिण आफ्रिकेवर कसा बसला याचा शिक्का? जाणून घ्या

Updated Jun 27, 2024 05:34 PM IST

t20 world cup 2024 semifinal : दक्षिण आफ्रिकेला आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत (एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही) ७ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. या ७ बाद फेरीच्या सामन्यांमध्ये आफ्रिकेला आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करता आली नाही आणि विजयाच्या जवळ आल्यावर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

SA vs AFG: : 'चोकर्स' या शब्दाचा नेमका अर्थ काय? दक्षिण आफ्रिकेवर कसा बसला याचा शिक्का? जाणून घ्या
SA vs AFG: : 'चोकर्स' या शब्दाचा नेमका अर्थ काय? दक्षिण आफ्रिकेवर कसा बसला याचा शिक्का? जाणून घ्या (AFP)

 

टी-20 विश्वचषक २०२४ च्या पहिल्या उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानचा पराभव केला आणि पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठली. या सामन्यात अफगाणिस्तानचा संघ ११.५ षटकात ५६ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने केवळ १ गडी गमावून लक्ष्य गाठले.

या विजयासह दक्षिण आफ्रिकेने त्यांच्यावरचा 'चॉकर्स'चा टॅग पुसून टाकला आहे. एडन मार्करामच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेने आयसीसी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत धडक मारून इतिहास रचला.

दक्षिण आफ्रिकेला आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत (एकदिवसीय आणि टी-२० दोन्ही) ७ वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. या ७ बाद फेरीच्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेला आपल्या क्षमतेनुसार कामगिरी करता आली नाही आणि विजयाच्या जवळ आल्यावर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे त्यांना क्रिकेट जगतात 'चोकर्स' म्हणून ओळखले जाऊ लागले. आता प्रश्न असा पडतो की चोकर्स हा शब्द कुठून आला?

चोक या शब्दापासून चोकर्स बनला आहे

चोकर्स हा टॅग चोक या शब्दावरून आला आहे. चोक म्हणजे अडकणे. महत्त्वाच्या क्षणी अडकणे किंवा थांबणे. दक्षिण आफ्रिकेच्या बाबतीतही असेच घडत असते. मोठ्या आणि बाद फेरीच्या सामन्यांमध्ये ते नेहमी पराभूत होतात, यामुळेच हा बलाढ्य संघ चोकर्स म्हणून ओळखला जाऊ लागला. 

१९९९ विश्वचषक उपांत्य फेरीतील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ चोकर्स म्हणून ओळखला जाऊ लागला. पण १९९२ आणि १९९६ च्या विश्वचषकातील पराभवाने याची सुरुवात झाली होती.

दक्षिण आफ्रिकेने चोकर्सचा टॅग काढून टाकला

मात्र, आता अफगाणिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात विजय मिळवून हा टॅग निघून गेला आहे. विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेने अंतिम फेरीत धडक मारली आहे. तीन दशकांनंतर दक्षिण आफ्रिकेने आयसीसी विश्वचषक (ODI आणि T20) फायनल गाठली आहे. T20 विश्वचषक २०२४ चा अंतिम सामना २९ जून रोजी होणार आहे. अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेचा सामना कोणाविरुद्ध होणार हे दुसऱ्या उपांत्य फेरीतील भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यातून कळेल.

 

Whats_app_banner

संबंधित बातम्या