Boxing Day Test History : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ची चौथी कसोटी गुरुवारी (२६ डिसेंबर) पासून मेलबर्न येथे खेळवली जाणार आहे. ही 'बॉक्सिंग डे टेस्ट' नावाने ओळखली जाईल. आता प्रश्न पडतो की क्रिकेटमध्ये 'बॉक्सिंग' हा शब्द आला कुठून? याशिवाय दुसरा प्रश्न असा की बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास काय आहे? चला तर मग जाणून घेऊया काय आहे बॉक्सिंग डे टेस्ट आणि त्याचा इतिहास.
ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांसारख्या अनेक देशांमध्ये बॉक्सिंग डे साजरा केला जातो. बॉक्सिंग डे साजरा करण्यामागे अनेक कथा आणि मान्यता आहेत. जे लोक ख्रिसमसच्या दिवशी म्हणजे २५ डिसेंबरला सुट्टी घेऊ शकत नाहीत, त्यांना २६ डिसेंबरला सुट्टी दिली जाते. सुट्टी सोबतच त्यांना एक बॉक्सही भेट म्हणून दिला जातो. त्यामुळे २६ डिसेंबरला बॉक्सिंग डे म्हटले जाते. बॉक्सिंग डे टेस्ट २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे.
बॉक्सिंग डे कसोटीचा इतिहास खूप जुना आहे. पहिली बॉक्सिंग डे कसोटी १९५० मध्ये खेळली गेली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात ऍशेस मालिकेदरम्यान पहिली बॉक्सिंग डे कसोटी झाली. तेव्हापासून बॉक्सिंग डे कसोटी खेळली जात आहे. ऑस्ट्रेलियासोबतच इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेतही बॉक्सिंग डे कसोटी खेळली जाते. यातील लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे पहिली बॉक्सिंग डे कसोटी मेलबर्नमध्येच खेळली गेली होती.
टीम इंडियाने आतापर्यंत ९ बॉक्सिंग डे टेस्ट खेळल्या आहेत. भारताने १९८५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली बॉक्सिंग डे कसोटी खेळली, जी अनिर्णित राहिली. टीम इंडियाने आतापर्यंत ९ पैकी फक्त २ बॉक्सिंग टेस्ट जिंकल्या आहेत.
टीम इंडिया- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह, यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (विकेटकीपर), सरफराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप , प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया- पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ॲबॉट, स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, ट्रॅव्हिस हेड (उपकर्णधार), जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, सॅम कोन्स्टन्स, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, मिचेल मार्श, झाय रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ (उपकर्णधार), मिचेल स्टार्क, ब्यू वेबस्टर.
संबंधित बातम्या