टी-20 विश्वचषक २०२४ मधील सुपर-८ चे दोन्ही गट ठरले आहेत. भारताला गट १ मध्ये स्थान देण्यात आले असून त्यात अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. टीम इंडिया २० जूनला अफगाणिस्तानविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे.
दोन्ही संघांचा हा सामना ब्रिजटाऊन येथील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे. जर आपण हवामानाचा अंदाज पाहिला तर, ब्रिजटाऊनमध्ये पुढील काही दिवस आकाश ढगाळ राहील, तर शुक्रवारी मुसळधार पाऊस अपेक्षित आहे.
विश्वचषकातील अनेक सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. अशा परिस्थितीत भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? याची चिंता चाहत्यांना सतावत आहे.
या टी20 विश्वचषक स्पर्धेत २० संघांचा समावेश होता, ज्यांना प्रत्येकी ५ संघांच्या ४ गटांमध्ये विभागण्यात आले होते. प्रत्येक गटातील टॉप-२ संघांना सुपर-८ टप्प्यात स्थान मिळाले आहे.
वास्तविक सुपर-८ हा बाद फेरीचा टप्पा नाही. ८ संघांची प्रत्येकी ४ संघांच्या दोन गटात विभागणी करण्यात आली असून प्रत्येक गटातील १ संघ उर्वरित ३ प्रतिस्पर्ध्यांशी सामना खेळणार आहे. दोन्ही गटातील टॉप-२ संघ संघांना उपांत्य फेरीत प्रवेश मिळेल.
उदाहरणार्थ जर टीम इंडियाने ग्रुप १ मधील तिन्ही सामने जिंकले तर जास्तीत जास्त गुणांच्या आधारे उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळेल.
भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील सुपर-८ सामना २० जून रोजी होणार आहे. पावसामुळे सामना रद्द झाल्यास नियमानुसार दोन्ही संघांना प्रत्येकी १ गुण दिला जाईल. हा एक गुण दोन्ही संघांसाठी फायदेशीर ठरू शकतो आणि त्यांच्यासाठी डोकेदुखीही ठरू शकतो.
उदाहरणार्थ, इंग्लंडचा स्कॉटलंडसोबतचा ग्रुप स्टेजमधील सामना रद्द करण्यात आला होता, त्यानंतर सुपर-८ साठी पात्र होणे त्यांच्यासाठी खूप कठीण झाले होते. स्पष्ट शब्दात समजून घ्यायचे झाले तर, भारत-अफगाणिस्तान सामन्यातून कोणताही संघ पावसामुळे बाहेर पडणार नाही कारण हा बाद फेरीचा टप्पा नाही.
संबंधित बातम्या