Rohit Sharma on Captaincy in BCCI Review Meeting : भारतीय क्रिकेट संघाचा कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार रोहित शर्मा गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. रोहित शर्मा सध्या खराब फॉर्मात आहे. तसेच, त्याला सिडनी कसोटीतून वगळण्यात आले होते. त्यानंतर त्याच्यावर ड्रेसिंग रूममधील चर्चा लीक केल्याचाही आरोप झाला.
दरम्यान, आता रोहित शर्माने बीसीसीआयच्या रिव्ह्यू मिटींगमध्ये आपले म्हणणे सविस्तरपणे मांडले आहे.
खरे तर काही दिवसांपूर्वी रोहित शर्माकडे सर्वोत्तम कर्णधार म्हणून पाहिले जात होते. पण आता त्याच्या पर्यायाची चर्चा सुरू झाली आहे.
याचे कारण भारताने मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या प्रतिष्ठित बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्येही भारताचा पराभव झला. या दोन मालिकांमध्ये रोहितला फलंदाजी आणि कर्णधारपद या दोन्ही बाबींमध्ये विशेष काहीच करता आले नाही. त्यामुळे त्याला शेवटच्या कसोटीतून वगळावे लागले होते.
शनिवारी बीसीसीआयची बैठक झाली. टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलियातील खराब कामगिरीबाबत ही आढावा बैठक होती. या बैठकीची चर्चा रंगली आहे. मीडिया रिपोर्टनुसार रोहित शर्माने आढावा बैठकीत सांगितले की, तो काही काळ कर्णधारपदी राहणार आहे आणि यादरम्यान बीसीसीआय पुढील कर्णधाराचा शोध घेऊ शकते.
या आढावा बैठकीत कर्णधार रोहित शर्मासह निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरही उपस्थित होते.
रोहित शर्माने बोर्डाला सांगितले आहे, की त्याला आणखी काही महिने संघाच्या कर्णधारपदी राहायचे आहे. दरम्यान, रोहितने बीसीसीआयला नवीन कर्णधाराचा शोध घेण्यासही सांगितले आहे.
रोहित शर्मानंतर जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवण्याबाबत बैठकीत चर्चा झाली, मात्र त्यावर अद्याप एकमत झालेले नाही. याचे सर्वात मोठे कारण म्हणजे जसप्रीत बुमराहची फिटनेस."
रोहित शर्मा २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व करणार असल्याचे निश्चित झाले आहे. मात्र, इंग्लंडविरुद्धच्या ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो कर्णधार असणार नाही हे जवळपास निश्चित झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित शर्माची निवड न होण्याचीही शक्यता आहे.
संबंधित बातम्या