WI vs SA T20 : वेस्ट इंडिजने १७ षटकात गाठलं डोंगराऐवढं लक्ष्य, निकोलस पूरनच्या वादळी फलंदाजीनं फिरवला सामना
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WI vs SA T20 : वेस्ट इंडिजने १७ षटकात गाठलं डोंगराऐवढं लक्ष्य, निकोलस पूरनच्या वादळी फलंदाजीनं फिरवला सामना

WI vs SA T20 : वेस्ट इंडिजने १७ षटकात गाठलं डोंगराऐवढं लक्ष्य, निकोलस पूरनच्या वादळी फलंदाजीनं फिरवला सामना

Aug 24, 2024 12:09 PM IST

वेस्ट इंडिज आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे, मालिकेतील पहिला सामना वेस्ट इंडिजने जिंकला. या सामन्यात चांगली धावख्या करूनही दक्षिण आफ्रिकेच्या संघाला पराभव पत्करावा लागला.

WI vs SA T20 : वेस्ट इंडिजने १७ षटकात गाठलं डोंगराऐवढं लक्ष्य, निकोलस पूरनच्या वादळी फलंदाजीनं फिरवला सामना
WI vs SA T20 : वेस्ट इंडिजने १७ षटकात गाठलं डोंगराऐवढं लक्ष्य, निकोलस पूरनच्या वादळी फलंदाजीनं फिरवला सामना (AFP)

दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळली जात आहे. मालिकेतील पहिला सामना (२३ ऑगस्ट) वेस्ट इंडिजने जिंकला. हा सामना ब्रायन लारा क्रिकेट अकादमीत खेळला गेला.

या सामन्यात यजमान वेस्ट इंडिजने हातातून निसटलेल्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवला.

४२ वर ५ विकेट पडल्या, तरी आफ्रिकेने १७४ धावा केल्या

प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेची सुरुवात खूपच खराब झाली. चौथ्या षटकातच दोन्ही सलामीवीरांना वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी पॅव्हेलियनमध्ये पाठवले. सातव्या षटकापर्यंत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता, तर धावफलकावर केवळ ४२ धावा होत्या.

यानंतर संघाचा चौथा फलंदाज ट्रिस्टन स्टब्स आणि पॅट्रिक क्रुगर यांनी डाव सांभाळला.

ट्रिस्टन स्टब्सने ४२ चेंडूत १८०.९५ च्या स्ट्राईक रेटने ७६ धावा केल्या. तर पॅट्रिक क्रुगरने ३२ चेंडूत १३७.५० च्या स्ट्राईक रेटने ४४ धावांचे योगदान दिले. या दोन फलंदाजांच्या बळावर दक्षिण आफ्रिकेने २० षटकांत ७ गडी गमावून १७४ धावांची सन्मानजनक धावसंख्या उभारली आणि वेस्ट इंडिजला १७५ धावांचे लक्ष्य मिळाले.

वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली

रोमारियो शेफर्ड आणि गुडाकेश मोती यांना एकही विकेट मिळाली नाही, पण अकील हुसेन, मॅथ्यू फोर्ड आणि शमर जोसेफ यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. अकील हुसेनने १, शामर जोसेफने २, तर मॅथ्यू फोर्डने ६.८० च्या इकॉनॉमीने ३ विकेट घेतल्या.

वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी आफ्रिकेला धुतलं

वेस्ट इंडिज संघाच्या दोन्ही सलामीच्या फलंदाजांनी दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी केली. ॲलेक अॅथन्झीने ३० चेंडूत ४० धावा केल्या, तर शाई होपने १४१ च्या स्ट्राइक रेटने ३६ चेंडूत ५१ धावा केल्या. निकोलस पूरनने आपला फॉर्म कायम ठेवत २५० च्या स्ट्राइक रेटने २६ चेंडूत ६५ धावा केल्या. वेस्ट इंडिजने १७.५ षटकात ३ गडी गमावून १७६ धावा केल्या आणि १३ चेंडू बाकी असताना ७ो गडी राखून सामना जिंकला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या