आयपीएल २०२४ च्या क्वालिफायर-२ सामन्यात सनरायझर्स हैदराबादने राजस्थान रॉयल्सचा ३६ धावांनी पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी गमावून १७५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात राजस्थानला २० षटकांत ७ गडी गमावून केवळ १३९ धावा करता आल्या.
सनरायझर्स हैदराबादच्या या विजयाचा हिरो शाहबाज अहमद ठरला. त्याने 3 महत्त्वाचे बळी घेतले. शाहबाज अहमदला त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
सामनावीराचा किताब पटकावल्यानंतर शाहबाज अहमद सामन्यानंतरच्या बोलतांना म्हणाला, की कर्णधार आणि प्रशिक्षकाने मला सांगितले की, आम्ही परिस्थितीनुसार तुमचा वापर करू, माझी भूमिका खालच्या क्रमाने फलंदाजी करण्याची होती. जेव्हा मी फलंदाजी करत होतो तेव्हा मला वाटले की या विकेटमध्ये काहीतरी आहे आणि ज्या पद्धतीने आवेश आणि संदीपने गोलंदाजी केली ते दिसून आले.
अशा परिस्थितीत मॅन ऑफ द मॅच मिळाल्याचा मला अभिमान वाटतो, संघात अतिशय निवांत वातावरण आहे. फायनल जिंकल्यावरच सेलिब्रेट करू, आज रात्री फक्त आराम करू."
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात शाहबाज अहमद इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळत होता. फलंदाजी करताना त्याने १८ चेंडूत १ षटकाराच्या मदतीने १८ धावा केल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना शाहबाज अहमदने आपल्या स्पेलच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालला (४२) बाद करून संघाला मोठे यश मिळवून दिले. त्यानंतर शाहबाजने १२व्या षटकात रियान पराग (६) आणि रविचंद्रन अश्विन यांना शून्यावर बाद केले. शाहबाजने संघासाठी ४ षटकात २३ धावा देत ३ बळी घेतले.