WC 2023 Records: वर्ल्डकपमध्ये पडला विक्रमांचा पाऊस, ४८ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  WC 2023 Records: वर्ल्डकपमध्ये पडला विक्रमांचा पाऊस, ४८ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही

WC 2023 Records: वर्ल्डकपमध्ये पडला विक्रमांचा पाऊस, ४८ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं काही

Nov 22, 2023 07:15 PM IST

World Cup 2023 Records: यंदाच्या विश्वचषकात रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

Virat Kohli
Virat Kohli (PTI)

World Cup 2023: यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात अनेक मोठे विक्रम पाहायला मिळाले. १९७५ साली सुरु झालेली स्पर्धेची तेरावी आवृत्ती भारतात खेळला गेला, जिथे ऑस्ट्रेलिया विजेता ठरला. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताला पराभव स्वीकारावा लागल्याने १४० कोटी भारतीयांची मन तुटली. मात्र, विश्वचषकाच्या ४८ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे काही विक्रम घडले आहेत, ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.

षटकांचा पाऊस

भारतात खेळल्या गेलेल्या या स्पर्धेत सर्वाधिक ६४४ षटकार पाहायला मिळाले. जे स्पर्धेच्या मागील १२ आवृत्तीपेंक्षा जास्त आहे. यापूर्वी इंग्लंडमध्ये खेळण्यात आलेल्या एकदिवसीय विश्वचषकात एकूण ४६३ मारले गेले होते, जो एक विक्रम होता. मात्र, यावेळी फलंदाजांनी षटकारांचा पाऊस पाडून नवा विक्रम केला. भारताकडून रोहित शर्माने सर्वाधिक ३१ षटकार ठोकले.

 

शतकांचा महापूर

या स्पर्धेत शतकांचाही महापूर आला. या स्पर्धेत फलंदाजांनी एकूण ४० शतके झळकावली, जी मागच्या विश्वचषकाच्या १२ आवृत्तीच्या तुलनेत सर्वाधिक आहेत. यावेळी दक्षिण आफ्रिकेचा सलामीवीर क्विंटन डी कॉकने सर्वाधिक चार शतके झळकावली. तर, विराट कोहलीने भारताकडून सर्वाधिक तीन शतके ठोकली. याशिवाय, न्यूझीलंडचा युवा फलंदाज रचिन रवींद्रच्या नावावर तीन शतकांची नोंद आहे. ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलने या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या गाठली. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात त्याने नाबाद २०१ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

सर्वाधिक धावा

यंदाच्या एकदिवसीय विश्वचषकात विराट कोहलीने सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराटने ११ सामन्यांतील ११ डावांमध्ये ९५.६२ च्या उत्कृष्ट सरासरीने ७६५ धावा केल्या.ज्यात तीन शतके आणि सहा अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीला २०२३ च्या विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरवण्यात आले. या कामगिरीसह कोहलीने एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत एकाच आवृत्तीत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रमही त्याच्या नावावर केला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या