टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या फलंदाजीची चमक फिकी पडली होती. श्रीलंकेतील एकदिवसीय मालिका हरल्यावर त्याच्या कर्णधारपद आणि फलंदाजी या दोन्हींवर प्रश्न उपस्थित झाले होते. यानंतर न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप झाल्यावर त्याच्या कॅप्टन्सीवर प्रश्नचिन्ह उपस्थित व्हायला सुरुवात झाली.
यानंतर बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा पराभव झाला, तेव्हा रोहित शर्माला सर्वाधिक अपमानाला सामोरे जावे लागले. कर्णधार असूनही त्याला सिडनी कसोटीतून वगळण्यात आले. एक खेळाडू म्हणूनच नव्हे तर कर्णधार म्हणूनही ही लाजीरवाणी गोष्ट होती. पण आता रोहित शर्मा चॅम्पियन्स ट्रॉफीच्या तयारीला लागला आहे.
खरंतर, रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो चौकार आणि षटकार मारताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाहून परतल्यानंतर रोहित शर्मा मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर मुंबईच्या रणजी संघासोबत सराव करत आहे.
तो पार्कमध्ये धावतानाही दिसला. व्हिडिओमध्ये त्याचे वाढलेले वजन स्पष्टपणे दिसत होते, परंतु ताज्या व्हिडिओमध्ये तो त्याच्या जुन्या लयीत दिसत आहे. पुल शॉट्स तितक्याच सहजतेने खेळताना दिसत आहे. यासह त्याने ऑस्ट्रेलियातील पराभवानंतर प्रथमच वैयक्तिक पोस्ट केली आहे.

त्याने दोन इमोजीसह व्हिडिओ पोस्ट केला आहे. या पोस्टला अल्पावधीतच जवळपास १० लाख लाइक्स आले आणि हजारो कमेंट्स आल्या. श्रीलंकेत एकदिवसीय मालिका खेळल्यानंतर रोहित शर्मा आता इंग्लंडविरुद्धच्या ३ वनडे सामन्यांच्या मालिकेत खेळताना दिसणार आहे. यानंतर तो आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ खेळताना दिसणार आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मध्ये भारताला २० फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे, तर दुसरा सामना २३ फेब्रुवारीला पाकिस्तानशी होणार आहे. या शानदार सामन्याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.
भारताला २ मार्चला शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडचा सामना करायचा आहे. जर भारत अंतिम फेरीत पोहोचला तर तो सामनाही दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल.
दुसरीकडे, रोहित शर्माशिवाय आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी हे संघाचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहलीचे शेवटचे मिशन असेल, अशीही चर्चा आहे. यानंतर ते आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतात. २०२४ च्या टी-20 आंतरराष्ट्रीय विश्वचषकात विजेतेपद पटकावल्यानंतर दोघांनीही या फॉरमॅटला अलविदा केला होता.
संबंधित बातम्या