मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Dinesh Karthik : एका सराव सत्रातील चेंडूंचा खर्च ३ ते ४ लाख, कार्तिकनं सांगितलं मुंबई इंडियन्सचं मोठेपण

Dinesh Karthik : एका सराव सत्रातील चेंडूंचा खर्च ३ ते ४ लाख, कार्तिकनं सांगितलं मुंबई इंडियन्सचं मोठेपण

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Apr 08, 2024 03:34 PM IST

Dinesh Karthik on mumbai indians : रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिकचे हे शेवटचे IPL असल्याचे मानले जात आहे. कार्तिकने आतापर्यंत फक्त एकदाच २०१३ मध्ये मुंबई इंडियन्ससोबत आयपीएलचे जेतेपद पटकावले आहे. मात्र, कार्तिकला ११ वर्षांपूर्वी झालेल्या एका चुकीबद्दल अजूनही पश्चाताप होतो.

Dinesh Karthik on mumbai indians : एका सराव सत्रातील चेंडूंचा खर्च ३ ते ४ लाख, कार्तिकनं सांगितलं मुंबई इंडियन्सचं मोठेपण
Dinesh Karthik on mumbai indians : एका सराव सत्रातील चेंडूंचा खर्च ३ ते ४ लाख, कार्तिकनं सांगितलं मुंबई इंडियन्सचं मोठेपण

Dinesh Karthik on Mumabi Indians : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा यष्टिरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक सध्या चर्चेत आला आहे. त्याने नुकतीच रविचंद्रन अश्विनला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल मोकळेपणाने भाष्य केले आहे.

ट्रेंडिंग न्यूज

कार्तिकने सांगितले, की त्याला चेन्नई सुपर किंग्जकडून खेळायचे आहे. सोबतच त्याने सांगितले ती मुंबई इंडियन्सने त्याला एक चांगला खेळाडू बनण्यास मदत केली असती. मात्र, ते शक्य झाले नाही.

दरम्यन, ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर कार्तिकने भारताकडून एकही सामना खेळलेला नाही.

कार्तिक २०१३ नंतर मुंबई इंडियन्सपासून वेगळा झाला

मुंबई इंडियन्सचा संघ IPL २०१३ मध्ये चॅम्पियन बनला. त्यानंतर दिनेश कार्तिकने मुंबई इंडियन्ससोबत फारकत घेतली. याबाबत तो रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब चॅनेलवर म्हणाला, की ‘माझ्या क्रिकेट कारकिर्दीत मला फारसे पश्चाताप नाहीत - पण एक म्हणजे मला २०१३ मध्ये रिटने व्हायचे होते, मुंबई इंडियन्स मला खरोखर मोठा खेळाडू बनण्यास मदत करू शकले असते आणि दुसरे म्हणजे मी CSK चा भाग होऊ शकलो नाही, परंतु मी त्यांचा खूप आदर करतो कारण ते प्रत्येक वेळी माझ्यासाठी बोली लावतात’.

मुंबई इंडियन्स आपल्या खेळाडूंना खूप मदत करते

दिनेश कार्तिकने सांगितले की, मुंबई इंडियन्स आपल्या खेळाडूंना पूर्ण पाठिंबा देते. एखाद्या खेळाडूला वर्षभरात केव्हाही सराव करायचा असेल तर फ्रेंचायझी पूर्ण व्यवस्था करते. कार्तिकच्या मते, एका सराव सत्रात ३ ते ४ लाख रुपये फक्त बॉलवरच खर्च होतो.

कार्तिक प्रत्येक आयपीएल सीझन खेळला आहे

दिनेश कार्तिक सध्या RCB कडून खेळत आहे, या मोसमात त्याने ५ सामन्यात ९० धावा केल्या आहेत. तसेच, IPL मधील खेळाडू म्हणून हा त्याचा शेवटचा हंगाम आहे. कार्तिकने त्याच्या आयपीएल प्रवासाची सुरुवात दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) मधून केली होती.

२००८ पासून आयपीएलच्या प्रत्येक हंगामात सहभागी झालेल्या ७ खेळाडूंच्या यादीत त्याचा समावेश आहे. या यादीत कार्तिकशिवाय एमएस धोनी, विराट कोहली, रोहित शर्मा, शिखर धवन, वृद्धिमान साहा आणि मनीष पांडे यांच्या नावांचा समावेश आहे.

IPL_Entry_Point