मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : सरफराजचा गुडघ्यावर बसून अप्पर कट, चाहत्यांना थेट मास्टर ब्लास्टर सचिनच आठवला

Video : सरफराजचा गुडघ्यावर बसून अप्पर कट, चाहत्यांना थेट मास्टर ब्लास्टर सचिनच आठवला

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Mar 08, 2024 08:32 PM IST

Sarfaraz Khan upper cut : यानंतर भारताचा युवा फलंदाज सरफराज खानने अर्धशतक झळकावले. या अर्धशतकी खेळीत त्याने मार्क वूडच्या एका वेगना चेंडूवर अपर कटचा फटका खेळला. या शॉटची चांगलीच चर्चा होत आहे. सरफराजची ही शॉट पाहून चाहत्यांना सचिन तेंडुलकरची आठवण झाली.

Video : सरफराजचा गुडघ्यावर बसून अपरकट, चाहत्यांना थेट मास्टर ब्लास्टर सचिन आठवला
Video : सरफराजचा गुडघ्यावर बसून अपरकट, चाहत्यांना थेट मास्टर ब्लास्टर सचिन आठवला

India Vs England 5th Test Dharamsala : भारत आणि इंग्लंड यांच्यात गुरुवारपासून (७ मार्च) ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जात आहे. धर्मशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे.

या सामन्यात भारत मजबूत स्थितीत पोहोचला आहे. भारताने आज (८ मार्च) दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ८ बाद ४७३ धावा केल्या होत्या. भारताकडून आज रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली.

सरफराज अपर कट, चाहत्यांना सचिन आठवला

यानंतर भारताचा युवा फलंदाज सरफराज खानने अर्धशतक झळकावले. या अर्धशतकी खेळीत त्याने मार्क वूडच्या एका वेगना चेंडूवर अपर कटचा फटका खेळला. या शॉटची चांगलीच चर्चा होत आहे. सरफराजची ही शॉट पाहून चाहत्यांना सचिन तेंडुलकरची आठवण झाली.

वास्तविक, मार्क वूडने सरफराजला १४६ किमी प्रतितास वेगाने बाउन्सर चेंडू टाकला. या चेंडूवर सरफराज खानने गुडघ्यावर बसून अप्पर कट शॉट खेळला आणि चौकार वसूल केला. सरफराज खानच्या अप्पर कट खेळण्याच्या शैलीने चाहत्यांना सचिन तेंडुलकरच्या ट्रेडमार्क शॉटची आठवण करून दिली आहे. सचिनही बाउन्सर चेंडूंवर असे अपर कट शॉट्स खेळत असे.

विशेष म्हणजे, सरफराजने याच मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याचा हा कसोटी करिअरचा केवळ तिसराच सामना आहे. त्याने त्याच्या पहिल्या कसोटीत राजकोट येथे दोन्ही डावांत सरफराजने अर्धशतके झळकावली होती. तर आज धर्मशाला कसोटीत सरफराज ६० चेंडूत ५६ धावा करून बाद झाला. यादरम्यान त्याने ८ चौकार आणि १ षटकार लगावला.

शेवटच्या कसोटीवर भारताची मजबूत पकड 

धर्मशाला येथे खेळल्या जात असलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यात भारतीय संघ दुसऱ्या दिवशी मजबूत स्थितीत आहे. कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिलने शतके झळकावली. नवोदित देवदत्त पडिक्कलने अर्धशतक झळकावले. यानंतर सर्फराजनेही अर्धशतक झळकावले. पहिल्या डावात इंग्लंडचा डाव २१८ धावांवर गारद झाला होता. भारताकडून कुलदीप यादवने ५ तर अश्विनने चार विकेट घेतल्या होत्या.

WhatsApp channel