IND VS AUS : गाबा कसोटीत फॉलोऑन वाचवणारा आकाशदीप मेलबर्नमध्ये शुन्यावर बाद, नॅथन लायनने पकडला अप्रतिम झेल
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND VS AUS : गाबा कसोटीत फॉलोऑन वाचवणारा आकाशदीप मेलबर्नमध्ये शुन्यावर बाद, नॅथन लायनने पकडला अप्रतिम झेल

IND VS AUS : गाबा कसोटीत फॉलोऑन वाचवणारा आकाशदीप मेलबर्नमध्ये शुन्यावर बाद, नॅथन लायनने पकडला अप्रतिम झेल

Dec 27, 2024 03:48 PM IST

IND VS AUS TEST : ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज नॅथन लायन चर्चेत आला आहे. त्याने भारताच्या आकाश दीप याचा अप्रतिम झेल घेतला.

IND VS AUS : गाबा कसोटीत फॉलोऑन वाचवणारा आकाशदीप मेलबर्नमध्ये शुन्यावर बाद, नॅथन लायनने पकडला अप्रतिम झेल
IND VS AUS : गाबा कसोटीत फॉलोऑन वाचवणारा आकाशदीप मेलबर्नमध्ये शुन्यावर बाद, नॅथन लायनने पकडला अप्रतिम झेल

मेलबर्न कसोटीत टीम इंडिया अडचणीत सापडली आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर भारताने पहिल्या डावात ५ बाद १६४ धावा केल्या होत्या. भारत अजूनही ३१० धावांनी पिछाडीवर आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ४७४ धावा केल्या होत्या.

दरम्यान, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी (२७ डिसेंबर) भारतीय संघाने ५१ धावांत दोन विकेट गमावल्या. कर्णधार रोहित शर्मा दुसऱ्याच षटकात बाद झाला तर केएल राहुल सेट झाल्यानंतर टी ब्रेकपूर्वी पॅव्हेलियनमध्ये परतला.

दोन विकेट लकर पडल्यानंतर विराट कोहलीसह यशस्वी जैस्वालने डावाची धुरा सांभाळली. यशस्वीने अर्धशतक पूर्ण केले, तो ८२ धावा करून धावबाद झाला.

जैस्वाल बाद होताच टीम इंडियाला गळती लागली. तो आऊट होताच अवघ्या ३० मिनिटांत सामन्याचा मार्ग बदलला. भारताने अतिशय झटपट ३ विकेट गमावल्या.

टीम इंडियाच्या तिसऱ्या विकेटसाठी कोहली आणि यशस्वी यांनी भागीदारी केली. या दोघांनी १०२ धावांची भागीदारी केली. यशस्वी बाद झाला. यशस्वीने ११८ चेंडूंचा सामना करत ८२ धावा केल्या. यादरम्यान त्याने ११ चौकार आणि १ षटकार लगावला. यशस्वी आऊट झाल्यानंतर विराटही बाद झाला. कोहली ३६ धावा करून बाद झाला. त्याने ८६ चेंडूंचा सामना करत ४ चौकार मारले.

आकाशदीप शुन्यावर बाद

जैस्वाल आणि कोहली बाद झाल्यानंतर संघाने आकाशदीप याला नाईट वॉचमन म्हणून पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले. पण तोही विकेट टिकवू शकला नाही. तो शुन्यावर बाद झाला. त्याला स्कॉट बोलंडने बाद केले.

आकाशदीप नॅथन लायनच्या हाती झेलबाद झाला. लायनने त्याचा अप्रतिम झेल घेतला. आकाशदीपचा झेल घेतल्यानंतर तो चांगलाच चर्चेत आला. कारण गाब्बा कसोटीचा नायक आकाश दीपने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताला फॉलोऑन टाळण्यास मदत केली.

पण येथे तो कमाल करू शकला नाही. नॅथन लायनने लेग स्लीपमध्ये डाइव्ह मारून त्याचा झेल टिपला

Whats_app_banner

संबंधित बातम्या