मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  KL Rahul Video : आता पाकिस्तानी गोलंदाजांची खैर नाही! केएल राहुलचा षटकार ठोकण्याचा सराव

KL Rahul Video : आता पाकिस्तानी गोलंदाजांची खैर नाही! केएल राहुलचा षटकार ठोकण्याचा सराव

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Aug 29, 2023 12:09 PM IST

kl rahul asia cup 2023 : आशिया कप सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया बंगळुरूमध्ये घाम गाळत आहे. आशिया चषक स्पर्धेच्या तयारीसाठी टीम इंडियाचे कॅम्प बंगळुरूमध्ये लावण्यात आला आहे.

kl rahul
kl rahul

KL Rahul Six Video : आशिया चषक ३० ऑगस्टपासून सुरू होणार आहे. त्याचबरोबर टीम इंडिया टूर्नामेंटमधला पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध २ सप्टेंबरला खेळणार आहे. आशिया कपच्या तयारीसाठी भारतीय खेळाडू गेल्या आठवडाभरापासून बंगळुरूमध्ये घाम गाळत आहेत. दरम्यान, केएल राहुलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

ट्रेंडिंग न्यूज

आशिया कप सुरू होण्यापूर्वी केएल राहुल चर्चेचा विषय राहिला आहे. वास्तविक, असे मानले जात आहे की केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त नाही आणि २ सप्टेंबरला पाकिस्तानविरुद्धचा सामना मिस करू शकतो.

मात्र, यादरम्यान केएल राहुलचे फलंदाजी आणि विकेटकीपिंग करतानाचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. अशातच आता त्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये केएल राहुल शानदार सिक्स मारताना दिसत आहे.

श्रेयस अय्यर मॅच फिट

इनसाइडस्पोर्ट्सने बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, "श्रेयस अय्यर तंदुरुस्त आहे. त्याने फिटनेस टेस्टही पास केली आहे. केएल राहुलबाबतचा निर्णय सामन्याच्या एक दिवसआधी घेतला जाईल. त्याने सराव सत्रात चांगली कामगिरी केली. "आहे. पण तो अजूनही १००% तंदुरुस्त नाही.

आमच्याकडे सामन्यासाठी काही दिवस आहेत. आम्हाला आशा आहे की तो तंदुरुस्त होईल, पण तो फिट नसेल तर इशान किशन बॅकअप म्हणून आहे."

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे बंगळुरूमध्ये ६ दिवसांचे प्रशिक्षण शिबिर होते. या शिबिरात सर्वांच्या नजरा केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांच्यावर होत्या, कारण या दोघांचाही फिटनेस चाचणी उत्तीर्ण न होता आशिया चषक संघात समावेश करण्यात आला होता.

WhatsApp channel
Cricket News मधील सर्व ताज्या घडामोडी Live Score सह Marathi News आणि प्रत्येक सामन्यागणिक बदलणारा पाहा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर