Video : केवळ अविश्वसनीय! असंही होऊ शकतं? ग्लेन मॅक्सवेलचा 'तो' झेल पाहून क्रिकेटविश्व आश्चर्यचकीत! पाहाच!
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Video : केवळ अविश्वसनीय! असंही होऊ शकतं? ग्लेन मॅक्सवेलचा 'तो' झेल पाहून क्रिकेटविश्व आश्चर्यचकीत! पाहाच!

Video : केवळ अविश्वसनीय! असंही होऊ शकतं? ग्लेन मॅक्सवेलचा 'तो' झेल पाहून क्रिकेटविश्व आश्चर्यचकीत! पाहाच!

Jan 01, 2025 05:25 PM IST

Will Prestwidge on Dan Lawrence Ball : बिग बॅश लीगमध्ये क्रिकेटच्या मैदानावरील अनेक चमत्कार पाहायला मिळत आहेत. ग्लेन मॅक्सवेलनं आज असाच एक पराक्रम केला.

केवळ अविश्वसनीय! ग्लेन मॅक्सवेलचा 'तो' झेल पाहून क्रिकेट जगताना तोंडात बोटं घातली! पाहाच!
केवळ अविश्वसनीय! ग्लेन मॅक्सवेलचा 'तो' झेल पाहून क्रिकेट जगताना तोंडात बोटं घातली! पाहाच!

Big Bash League News in Marathi : क्रिकेटच्या मैदानावर अविश्वसनीय म्हणावे असे अनेक प्रसंग घडत असतात. त्यात कठीण झेल, धडाकेबाज फलंदाजी आणि भेदक गोलंदाजीच्या चमत्काराचा समावेश असतो. मात्र, बिग बॅश लीगमध्ये ग्लेन मॅक्सवेलनं केलेला पराक्रम या सर्वांवरील कळस म्हणावा असा होता.

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेल यानं बुधवारी केएफसी बिग बॅश लीगमध्ये ब्रिस्बेन हीट आणि मेलबर्न स्टार्स यांच्यातील सामन्यात एक अप्रतिम झेल घेतला. या कॅचचा व्हिडिओ सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. क्रिकेटप्रेमी पुन्हा पुन्हा हा झेल पाहत आहेत.

धडाकेबाज फलंदाज विल प्रेस्टविज यानं डॅन लॉरेन्सच्या चेंडूवर लाँग-ऑनवर एक उंच अशा जोरदार फटका मारला. हा चेंडू थेट सीमापार गेला. चेंडूचा पाठलाग करताना मॅक्सवेलही सीमारेषेच्या बाहेर गेला. सीमारेषेबाहेर घेतलेला झेल हा षटकार असतो. मात्र, मॅक्सवेलनं इथंच प्रसंगावधान व हुशारी दाखवली. सीमारेषेबाहेर हवेत असलेला चेंडू जमिनीवर पडण्याआधी मॅक्सवेलनं हवेत उडी घेऊन हा चेंडू सीमारेषेच्या आत ढकलला. चेंडू पुन्हा खाली पडण्याआधी मॅक्सवेल सीमारेषेच्या आत आला आणि त्यानं तो झेल टिपला.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांमध्ये मॅक्सवेल हा 'बिग शो' म्हणून ओळखला जातो. धडाकेबाज फलंदाजी आणि चतुर गोलंदाजीच्या जोरावर कोणत्याही क्षणी सामन्याचा निकाल पलटवण्याची त्याची क्षमता आहे. एखाद्या अ‍ॅथलिटच्या उत्साहानं खेळणारा व चपळाईनं क्षेत्ररक्षण करणारा मॅक्सवेल संघासाठी एक भक्कम सुरक्षाकवच ठरतो. 

२०२५ च्या आयपीएलमध्ये पंजाब किंग्सकडून खेळणार

भूतकाळातील कामगिरी उत्तम असूनही २०२५ च्या मेगा लिलावापूर्वी आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूनं त्याला मूक्त केलं होतं. T20 फ्रँचायझी लीगच्या मागील सीझनमध्ये त्याच्या फॉर्ममध्ये झालेली मोठी घसरण हे त्याचं कारण होतं. मात्र, आरसीबीनं गमावलेला हा खेळाडू पंजाब किंग्ससाठी फायद्याचा ठरू शकतो. प्रीती झिंटाच्या मालकीच्या संघानं ४.२ कोटी रुपये मोजून त्याला आपल्याकडं घेतलं आहे.

मॅक्सवेलनं २०१४ आणि २०१७ दरम्यान त्यानं चांगली खेळी केली होती. PBKS मध्ये परतल्यानं भारतीय भूमीवर तो पुन्हा धमाल करण्याची शक्यता आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या