Austria vs Romania : १२ चेंडूत ६१ धावांची गरज, पाहा ऑस्ट्रियानं हरलेला सामना कसा जिंकला?
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Austria vs Romania : १२ चेंडूत ६१ धावांची गरज, पाहा ऑस्ट्रियानं हरलेला सामना कसा जिंकला?

Austria vs Romania : १२ चेंडूत ६१ धावांची गरज, पाहा ऑस्ट्रियानं हरलेला सामना कसा जिंकला?

Jul 16, 2024 04:35 PM IST

ECI T10: ऑस्ट्रिया विरुद्ध रोमानिया यांच्यातील थरारक सामन्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ऑस्ट्रियाने रोमानिया विरुद्धच्या सामन्यात निसटता विजय मिळवला
ऑस्ट्रियाने रोमानिया विरुद्धच्या सामन्यात निसटता विजय मिळवला

Viral Video: युरोपियन क्रिकेट इंटरनॅशनल टी-१० स्पर्धेत १४ जुलै रोजी ऑस्ट्रिया विरुद्ध रोमानिया सामना खेळला गेला. क्रिकेटमध्ये काहीच अशक्य नाही, असे या सामन्यातून पाहायला मिळाले. दोन षटकांत ६१ धावांची गरज असताना फलंदाजी करणारा संघाने अवघ्या ११ चेंडूत सामना जिंकतो, ज्याचा कोणीच विचार केला नसेल. बुखारेस्ट येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात रोमानियाने १० षटकात २ विकेट गमावत १६७ धावा केल्या. प्रत्युत्तरात ऑस्ट्रियाने ८ षटकात १०७ धावांवर तीन विकेट गमावल्या. कर्णधार आकिब इक्बाल ९चेंडूत २२ धावांवर खेळत होता. तर, इम्रान आसिफ ९ चेंडूत १४ धावांवर खेळत होता. ऑस्ट्रियाला शेवटच्या दोन षटकात विजयासाठी ६१ धावा करायच्या होत्या. मात्र, त्यानंतर मैदानात जे घडले, यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

ऑस्ट्रियाच्या संघाला दोन षटकांत ६१ धावांची गरज असताना रोमानियाकडून मनमीत कोली गोलंदाजी आला. मात्र, या षटकात त्याने वाइड-नो बॉलसह एकूण १० चेंडू टाकले, ज्यात त्याला ४१ धावा पडल्या. इम्रान आसिफने पहिल्या बॉलवर सिंगल घेतला, त्यानंतर वाईड बॉलवर चौकार, त्यानंतर पुढच्या चेंडूवर षटकार, अशा प्रकारे या षटकात दोन चेंडूत १२ धावा झाल्या. पुढच्या चेंडूवर पुन्हा चौकार, नंतर षटकार. येथे पोहोचल्यानंतर कोलीने आपली लय पूर्णपणे गमावली. पुढचा चेंडू नो बॉल ठरला, ज्यावर ऑस्ट्रेयाच्या फलंदाजाने षटकार लगावला. मग एक डॉट बॉल, मग नो बॉलवर सिक्स, मग वाइड बॉलवर एक्स्ट्रा रन आणि मग शेवटच्या बॉलवर चौकार. अशाप्रकारे कोलीने एका षटकांत १, ५ WD, ६, ४, ६, ७NB, ०, ७NB, १WD, १ अशा धावा दिल्या. यानंतर ऑस्ट्रियाची धावसंख्या ९ षटकांत १४८ झाली. शेवटचे षटक चमल्का फर्नांडोने टाकले आणि त्याचेही षटकाराने स्वागत करण्यात आले, त्यानंतर एकेरीनंतर सलग तीन षटकार खेचले आणि ऑस्ट्रियाने ९.५ षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात १७३ धावा करून सामना जिंकला.

युवराज सिंह- रॉबिन उथप्पाचा तो व्हिडिओ व्हायरल

वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स २०२४ च्या अंतिम सामन्यात भारत चॅम्पियन्सने पाकिस्तान चॅम्पियन्सचा पाचविकेट्सने पराभव केला आणि विजेतेपद पटकावले. या सामन्यात अंबाती रायुडूने शानदार अर्धशतक झळकावले तर युसूफ पठाणने १६ चेंडूत ३० धावा करत भारतीय चॅम्पियन्सला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अंतिम सामन्यात पाकिस्तान चॅम्पियन्सने प्रथम फलंदाजी करत १५६ धावा केल्या होत्या. त्यानंतर भारत चॅम्पियन्सने शेवटच्या षटकात ५ विकेट गमावून विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात शानदार अर्धशतक झळकावणाऱ्या रायुडूला सामनावीर आणि युसूफ पठाणला टूर्नामेंटच्या सर्वोत्तम खेळाडूचा किताब देण्यात आला.

भारतीय खेळाडू चषक घेऊन आनंद साजरा करत होते, त्याचवेळी क्रिकेटपटूंच्या मुलांनीही त्यांचे सेलिब्रेशनचे फोटो क्लिक करत होते. फोटो क्लिक करताना रॉबिन उथप्पा कॅमेराच्या मध्यभागी आला. त्यामुळे युवीचा फोटो कॅमेऱ्यासमोर दिसत नव्हता. हे पाहून युवीने उथप्पाच्या पाठमागून टपली मारली. कोणी मारले, हे उथप्पाला समजले नाही. परंतु, थोड्यावेळाने युवीने त्याच्यासोबत मस्ती केल्याचे त्याच्या लक्षात आले.

Whats_app_banner