कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताला घरच्या मैदानावर व्हाईटवॉशला सामोरे जावे लागले आहे. न्यूझीलंडने घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत टीम इंडियाचा ३-० असा पराभव केला. या पराभवानंतर भारतीय संघाचा जगभरातून भारतीय संघावर टीका केली जात आहे. अशा परिस्थितीत शेजारचा देश पाकिस्तान कसा मागे राहील? भारताच्या या पराभवावर पाकिस्तानचे अनेक क्रिकेट तज्ज्ञ आपलं मत मांडत आहेत. याचदरम्यान, पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज वसीम अकरमने केलेले वक्तव्य भारतीय चाहत्यांना पचवणे कठीण जाणार आहे. लाईव्ह कॉमेंट्रीदरम्यान वसीम अकरमने पाकिस्तानचा संघ भारताला हारवू शकतो, अशी कमेंट केली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना मेलबर्नमध्ये खेळला जात आहे. यावेळी मायकेल वॉन आणि वसीम अकरम एकत्र कॉमेंट्री करत होते. त्यानंतर वॉनने भारताच्या पराभवावर चर्चा करताना सांगितले की, 'मला भारत आणि पाकिस्तान यांच्यात कसोटी मालिका पाहायची आहे. त्याला उत्तर देताना वसीम अक्रम म्हणाले की, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मालिका पाहण्यासाठी दोन्ही देशातील क्रिकेट चाहते खूप उत्सुक आहेत. पुढे वसीम अकरम म्हणाले की, पाकिस्तानकडे भारताला पराभूत करण्याची संधी आहे. पाकिस्तान भारताला हरवू शकतो.
न्यूझीलंडने घरच्या मैदानावर त्यांना ३-० असे पराभूत केले. पाकिस्तानने नुकतीच २०२१ नंतरची पहिली घरगुती मालिका इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर जिंकली आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात यजमानसंघाला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. ज्यानंतर संघ व्यवस्थापनाने मोठे बदल करत वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली आणि काही फिरकी गोलंदाजांना संघात स्थान दिले.
नोमान अली आणि साजिद खान या फिरकीपटूंच्या जोरावर पाकिस्तानला पुढील दोन सामने जिंकता आले. या दोघांनी दोन सामन्यांत ४० पैकी ३९ बळी घेतले. भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटची कसोटी मालिका 2008 मध्ये खेळली गेली होती जेव्हा पाकिस्तान संघ भारत दौऱ्यावर आला होता. त्यावेळी टीम इंडियाने पाकिस्तानला १-० असे पराभूत करण्यात यश मिळवले होते.