पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम सध्या चर्चेत आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानी क्रिकेट किंवा अन्य कोणत्याही वक्तव्यामुळे तो चर्चेत नाही. खरे तर माजी वेगवान गोलंदाज चर्चेत येण्याचे कारण म्हणजे त्याची मांजर.
वास्तविक, वसीम अक्रम सध्या ऑस्ट्रेलियामध्ये आहे, जिथे पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि एकदिवसीय मालिका संपल्यानंतर टी -20 मालिकेसाठी तयारी करत आहे. अक्रम या मालिकेत कॉमेंट्री करत आहे.
समालोचन करताना अक्रमने असा खुलासा केला की ऐकून सगळेच थक्क झाले. त्याने सांगितले की त्याच्याकडे एक मांजर आहे ज्याचे केस कापण्यासाठी तो गेला होता आणि तिथे त्याने इतके पैसे खर्च केले ज्याची कोणालाही अपेक्षा नव्हती.
अक्रमने सांगितले, की तो त्याच्या मांजरीचे केस कापण्यासाठी गेला होता, ज्याचे बिल १००० ऑस्ट्रेलियन डॉलर झाले. जर ही रक्कम भारतीय मूल्यात रूपांतरित केली तर ती अंदाजे ५६००० रुपये आहे. जर ही रक्कम पाकिस्तानी मूल्यात रूपांतरित केली तर ती अंदाजे १,८१,००० पाकिस्तानी रुपये आहे, जी खूप मोठी रक्कम आहे.
वसीम अक्रम यांने सांगितले की, जेव्हा त्याला हे बील दाखवण्यात आले तेव्हा तो आश्चर्यचकित झाला कारण त्याला याची अपेक्षा नव्हती. अक्रमने सांगितले की यात मेडिकल प्रोसिजर, एनेस्थिशिया, हेअरकट, पोस्ट प्रोसिजर केअर, कार्डिओ टेस्ट यांचा समावेश आहे. या सर्वांचा समावेश करून त्याचे बिल लाखांवर आले.
अक्रमचे बोलणे ऐकून त्याच्यासोबतचे समालोचकही आश्चर्यचकित झाले आणि हसायला लागले. अक्रमने पुढे सांगितले की, या पैशात त्याने पाकिस्तानमध्ये २०० मांजरींचे केस कापले असते.
अक्रमच्या या खुलाशानंतर सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे. हे ऐकून सर्वांना आश्चर्य वाटले. मांजरीच्या केस कापण्यासाठी इतके पैसे आकारणे ही मोठी गोष्ट आहे. ही अपेक्षा कोणी करणार नाही. या कामासाठी किती पैसे लागतील हे अक्रमला आधी कळले असते तर कदाचित तो टाळू शकला असता. यानंतर ऑस्ट्रेलियात प्राणी पाळण्यासाठी होणाऱ्या खर्चाचीही सोशल मीडियावर चर्चा आहे.