Ind vs NZ : कमबॅक असावं तर असं… ७ शिकार त्यापैकी ५ क्लीन बोल्ड, वॉशिंग्टन सुंदरच्या सर्व विकेट्स येथे पाहा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Ind vs NZ : कमबॅक असावं तर असं… ७ शिकार त्यापैकी ५ क्लीन बोल्ड, वॉशिंग्टन सुंदरच्या सर्व विकेट्स येथे पाहा

Ind vs NZ : कमबॅक असावं तर असं… ७ शिकार त्यापैकी ५ क्लीन बोल्ड, वॉशिंग्टन सुंदरच्या सर्व विकेट्स येथे पाहा

Published Oct 24, 2024 05:53 PM IST

Washington Sundar : वॉशिंग्टन सुंदरने साडेतीन वर्षांनंतर भारतीय कसोटी संघात पुनरागमन करून सर्वांची मने जिंकली. या उंच ऑफस्पिनरने पुणे कसोटीत पहिल्याच दिवशी न्यूझीलंडला २५९ धावांत गुंडाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

Ind vs NZ : कमबॅक असावं तर असं… ७ शिकार त्यापैकी ५ क्लीन बोल्ड, वॉशिंग्टन सुंदरच्या सर्व विकेट्स येथे पाहा
Ind vs NZ : कमबॅक असावं तर असं… ७ शिकार त्यापैकी ५ क्लीन बोल्ड, वॉशिंग्टन सुंदरच्या सर्व विकेट्स येथे पाहा (PTI)

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना आज (२४ ऑक्टोबर) गुरुवारपासून पुणे येथे खेळवला जात आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियमवर न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथम याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर न्यूझीलंडने पहिल्या डावात सर्वबाद २५९ धावा केल्या. तर प्रत्युत्तरात भारताने आपल्या पहिल्या डावात पहिल्या दिवसअखेर १ बाद १६ धावा केल्या होत्या.

तत्पूर्वी, भारतीय संघाने या सामन्यासाठी आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल केले. मोहम्मद सिराज, केएल राहुल आणि कुलदीप यादव यांच्या जागी आकाशदीप, वॉशिंग्टन सुंदर आणि शुभमन गिल यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश केला.

विशेष म्हणजे, वॉशिंग्टन सुंदरला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवण्याची हेड कोच गौतम गंभीरची चाल कामी आली. कारण वॉशिंग्टन सुंदरने एक-दोन नव्हे तर न्यूझीलंडच्या ७ विकेट घेतल्या, ज्यात त्याने ५ फलंदाजांना क्लीन बोल्ड केले. वॉशिंग्टन सुंदरच्या सर्व विकेट्स पाहण्यासाठी क्लीक करा

पहिली विकेट, रचिन रवींद्र- क्लीन बोल्ड

कुलदीप यादवच्या जागी संघात आलेल्या सुंदरने जबरदस्त फॉर्मात असलेल्या रचिन रवींद्रला क्लीन बोल्ड केले. सुंदरच्या ऑफस्पिन चेंडूने रचिनला चकवले आणि दांडी उडवली. मालिकेतील पहिल्या सामन्यात १३४ आणि नाबाद ३९ धावा करणाऱ्या रवींद्रने आज ६५ धावांचे योगदान दिले. तो बाद झाल्यानंतर न्यूझीलंडचा डाव गडगडला.

दुसरी विकेट, टॉम ब्लंडेल- क्लीन बोल्ड

त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरने टी-टाइमपूर्वीच्या शेवटच्या चेंडूवर टॉम ब्लंडेलला (३ धावा) बोल्ड केले. ऑफ-स्पिनरसाठी ही स्वप्नवत डिलिव्हरी होती. सुंदरचा फ्लाइटेड चेंडू ब्लंडेलच्या बॅट आणि पॅडमधून गेला आणि स्टंम्पपवर आदळला.

तिसरी विकेट, डॅरिल मिशेल- पायचीत

सुंदरचा तिसरा बळी डॅरिल मिशेल होता. ५३ चेंडूत १८ धावा करणारा मिशेल पुढच्या पायाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत होता, पण तो पूर्णपणे बीट झाला. यानंतर भारतीय खेळाडूंनी दमदार अपील केले. पण अंपायरने नॉट आऊट दिले. त्यानंतर भारताने रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये मिशेल बाद झाला.

चौथी विकेट ग्लेन फिलिप्स- झेलबाद

ग्लेन फिलिप्सने फ्लाइटेड चेंडूवर मिड-ऑफवर मोठा शॉट मारला. पण तो बरोबर बॅटवर आला नाही. अशा स्थितीत आर अश्विनने त्याचा झेल घेतला. फिलिप्सने ३१ चेंडूत ९ धावा केल्या. न्यूझीलंडला २३६ धावांवर सातवा धक्का बसला आणि आता सुंदरच्या खात्यात चौथी विकेट जमा झाली.

पाचवा विकेट, टीम साऊथी- क्लीन बोल्ड

४५ महिन्यांनंतर पुनरागमन करणाऱ्या वॉशिंग्टन सुंदरने कसोटी कारकिर्दीतील पहिल्यांदा ५ बळी घेतले. टीम साऊदी त्याचा पाचवा विकेट ठरला. टीम साउदीला चेंडू समजला नाही. त्याला काही कळायच्या आत लेग स्टंपवर पडलेला चेंडू वळला आणि ऑफस्टम्पवर येऊन आदळला. साऊदी ८ चेंडूत ५ धावा धावांवर क्लीन बोल्ड झाला. न्यूझीलंडला २४२ धावांवर आठवा धक्का बसला.

सहावी विकेट एजाज पटेल- क्लीन बोल्ड

एजाज पटेलकडे साध्या सरळ लेन्थ बॉलला उत्तर नव्हते. चेंडू स्कीट झाला आणि सरळ आला नाही. एजाज पटेलने हा चेंडू टर्न होईल, अशा पद्धतीने खेळला पण सरळ असलेला चेंडू त्याच्या स्टंम्प्सवर आदळला. पटेलनने ४ धावा केल्या आणि न्यूझीलंडने २५२ धावांवर नववी विकेट गमावली.

सातवा विकेट, मिचेल सँटनर- क्लीन बोल्ड

न्यूझीलंडला ऑल आऊट करण्यासाठी वॉशिंग्टन यापेक्षा सुंदर चेंडू टाकू शकला नसता. सुंदरने शॉर्ट चेंडू टाकला. या चेंडूने मिचेल सँटनरचा ऑफ स्टंम्प उडवला. मिचेल सँटनर फ्लाइटेड चेंडूसाठी तयार होता, पण अचानक सुंदरने शॉर्ट बॉल टाकला, त्यामुळे त्याला चेंडूची लेंथ पटकन समजली नाही.

सँटनरने चेंडूवर कट शॉट मारण्याचा प्रयत्न केला पण तो बीट झाला. अशाप्रकारे वॉशिंग्टन सुंदरने आपल्या करिअरची सर्वोत्तम गोलंदाजी केली. त्याने २३.१ षटकात ५९ धावात ७ विकेट घेतले बाद. सँटनर ३३ धावा करून बाद झाला आणि न्यूझीलंडचा डाव २५९ धावांवर संपला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या