ऑस्ट्रेलिया दौऱ्यात युवराज सिंह एका अभिनेत्रीला करत होता डेट, स्वत:च सांगितला २००८ मधील 'तो' किस्सा!-was dating an actress told her lets not meet yuvraj singh blast from the past ,क्रिकेट बातम्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  ऑस्ट्रेलिया दौऱ्यात युवराज सिंह एका अभिनेत्रीला करत होता डेट, स्वत:च सांगितला २००८ मधील 'तो' किस्सा!

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात युवराज सिंह एका अभिनेत्रीला करत होता डेट, स्वत:च सांगितला २००८ मधील 'तो' किस्सा!

Sep 26, 2024 02:08 PM IST

Yuvraj Singh: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००८ मध्ये खेळल्या गेलेल्या बॉर्डर- गावस्कर करंडक स्पर्धेत भारताचा स्टार फलंदाज युवराज सिंह एका अभिनेत्रीला डेट करत असल्याची माहिती समोर आली.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यात युवरात करत होता एका अभिनेत्रीला डेट
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात युवरात करत होता एका अभिनेत्रीला डेट (AFP)

Border Gavaskar Trophy 2004: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २००७/०८ बॉर्डर-गावस्कर करंडक मालिका खेळण्यात आली. मात्र, ऑस्ट्रेलियात खेळण्यात आलेली ही चार सामन्यांची मालिका अंपायरिंग वाद आणि इतर गोष्टींमुळे वादग्रस्त ठरली. यामुळे मैदानावर आणि मैदानाबाहेर सर्वत्र तणावाचे वातावरण होते. मात्र, भारताचा माजी स्टार ऑलराऊंडर युवराज सिंह हा दौरा आणखी वेगळ्या कारणासाठी अविस्मरणीय ठरला.

क्लब प्रेयरी फायर पॉडकास्टमध्ये बोलताना युवराज सिंहने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील एक किस्सा शेअर केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात बॉर्डर- गावस्कर मालिका खेळली जात असताना तो एका अभिनेत्रीला डेट करत होता.

युवराज सिंह म्हणाला की, ‘२००८ मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यात मी एका अभिनेत्रीला डेट करत होतो. मी तिचे नाव घेणार नाही. सध्या ती खूप चांगले आयुष्य जगत आहे. त्यावेळी ती ऑस्ट्रेलियामध्ये एका चित्रपटाची शूटींग करत होती. मी तिला आपण भेटू शकत नाही असे सांगितले. कारण त्यावेळी मी ऑस्टेलिया दौऱ्यावर होतो आणि मला खेळावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज होती. पंरतु, ती माझ्यापाठोपाठ कॅनबेराला पोहोचली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीत मला काही खास कामगिरी करता आली नाही. त्यानंतर तिला कॅनबेरा येथे पाहून मी चकीत झालो. मी तिला विचारले तू येथे काय करतेस? यावर ती म्हणाली की, मला तुझ्यासोबत वेळ घालवायचा आहे.’

पुढे युवराज सिंह म्हणाला की, 'त्या दिवशी रात्री आम्ही खूप गप्पा मारल्या. त्यावेळी मी तिला सांगितले की, तुला तुझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे आणि मला माझ्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. कारण मी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे आणि याचा अर्थ तुला माहिती आहे. त्यानंतर आमची शेवटची भेट ठरली.' युवराजने अभिनेत्रीचे नाव सांगण्यास नकार दिला असला तरी २००७ मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणाऱ्या दीपिका पदुकोणला युवराज डेट करत असल्याच्या अफवा मोठ्या प्रमाणात पसरल्या होत्या.

मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये भल्याभल्या गोलंदाजांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या युवराज सिंहची कसोटी कारकीर्द खऱ्या अर्थाने कधीच तेवढ्या उंचीवर पोहोचली नाही. युवराज सिंहने ४० कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्रतिनिधित्व केले. मात्र, त्याला लाल चेंडूच्या फॉरमॅटमध्ये ठसा उमटवता आला नाही. युवराजने कसोटी क्रिकेटमध्ये ३३.९२ धावा केल्या. परंतु, २००४ मध्ये पाकिस्तानविरुद्ध लाहोरमध्ये खेळलेल्या कसोटी सामन्यात युवराज सिंहने ठोकलेले शतक अजूनही त्याचे चाहते विसरू शकले नाहीत.

Whats_app_banner
विभाग