वानखेडे स्टेडियमवर दिसला विनोद कांबळीचा डॅशिंग लुक, पत्नी अँड्रिया हेविटच्या सौंदर्याचीही बरीच चर्चा
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  वानखेडे स्टेडियमवर दिसला विनोद कांबळीचा डॅशिंग लुक, पत्नी अँड्रिया हेविटच्या सौंदर्याचीही बरीच चर्चा

वानखेडे स्टेडियमवर दिसला विनोद कांबळीचा डॅशिंग लुक, पत्नी अँड्रिया हेविटच्या सौंदर्याचीही बरीच चर्चा

Jan 21, 2025 12:46 PM IST

मुंबई क्रिकेट असोसिएशनने वानखेडे स्टेडियमच्या ५०व्या वर्धापनदिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. विनोद कांबळी त्याच्या पत्नीसह या कार्यक्रमात पोहोचला होता.

वानखेडे स्टेडियमवर दिसला विनोद कांबळीचा डॅशिंग लुक, पत्नी अँड्रिया हेविटच्या सौंदर्याचीही बरीच चर्चा
वानखेडे स्टेडियमवर दिसला विनोद कांबळीचा डॅशिंग लुक, पत्नी अँड्रिया हेविटच्या सौंदर्याचीही बरीच चर्चा

Vinod Kambli Wife Andrea Hewitt Wankhede Stadium : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कांबळी याला अनेक दिवसांपासून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण रुग्णालयातून डिस्जार्ज मिळाल्यानंतर तो वानखेडे स्टेडियमच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या सोहळ्यात पोहोचला होता. वानखेडे स्टेडियवर त्याचा सन्मानही करण्यात आला.

वानखेडे स्टेडियवर झालेल्या या खास कार्यक्रमात विनोद कांबळीसोबतच सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर आणि वसीम जाफर या दिग्गज खेळाडूंनी हजेरी लावली होती. या खेळाडूंनी मुंबई क्रिकेटच्या इतिहासात आपले अतुलनीय योगदान दिले.

विनोद कांबळी याच्या मेंदूत रक्ताच्या गुठळ्या झाल्या होत्या, त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. या कठीण काळात कांबळीची पत्नी अँड्रिया हेविट प्रत्येक पावलावर त्याच्या पाठीशी उभी राहिली  आहे आणि त्याला पुन्हा बरे करण्यात महत्त्वाचे योगदान देत आहे.

मुंबई क्रिकेट असोसिएशनने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विनोद कांबळी पत्नीसोबत दिसला तेव्हा सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळल्या. कांबळीने ग्रे कलरचा सूट आणि गॉगल घातला होता, ज्यामध्ये तो खूपच देखणा दिसत होता. त्याची पत्नी एंड्रिया हेविट हिनेही तिच्या सुंदर लुक्सने बरीच चर्चा मिळवली.

विनोद कांबळी याच्या प्रकृतीत थोडीशी सुधारणा झाली आहे. अशा अवस्थेतही तो वानखेडे स्टेडियवर पोहोचला होता. कांबळीला चालताना इतरांरा आधार घ्यावा लागतो. त्याला अजूनही चालण्यास त्रास होत आहे.

या कार्यक्रमात वानखेडे मैदानाशी निगडीत आपल्या आठवणी सांगताना विनोद कांबळी म्हणाला, या मैदानावर मी माझ्या कारकिर्दीतील पहिले द्विशतक इंग्लंडविरुद्ध झळकावले आणि त्यानंतर अनेक शतकी खेळी खेळली.

१७ कसोटी सामन्यांच्या कारकिर्दीत त्याने ४ शतके आणि ३ अर्धशतकांसह १०८४ धावा केल्या. याशिवाय त्याने आपल्या कारकिर्दीत १०४  एकदिवसीय सामने खेळताना २४७७ धावा केल्या. त्याने आपल्या एकदिवसीय कारकिर्दीत २ शतके आणि १४ अर्धशतके झळकावली.

Whats_app_banner

संबंधित बातम्या