दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघटनेने (DDCA) शनिवारी (२८ सप्टेंबर) त्यांच्या अंडर-१९ क्रिकेट संघाची घोषणा केली. माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याचा मुलगा आर्यवीर सेहवाग याची या संघात निवड झाली आहे.
पुद्दुचेरी येथे खेळल्या जाणाऱ्या अंडर १९ विनू मांकड ट्रॉफी वनडे स्पर्धेसाठी हा संघ जाहीर करण्यात आला. ४ ऑक्टोबरपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे.
प्रणव पंतला दिल्ली अंडर-१९ संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. उपकर्णधारपद सार्थक रे याच्याकडे सोपवण्यात आले आहे. डीडीसीएने वीरेंद्र सेहवागच्या मुलाची एखाद्या मोठ्या स्पर्धेसाठी निवड करण्याची ही पहिलीच वेळ आहे. आर्यवीर सेहवाग त्याच्या वडिलांप्रमाणेच स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो.
आर्यवीर दिल्लीच्या १६ वर्षांखालील संघाचा देखील भाग आहे. वडिलांप्रमाणेच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्यासाठी मेहनत घेत आहे. स्वत: पिता सेहवागही त्याला प्रशिक्षण देत आहेत.
प्रणव पंत (कर्णधार), सार्थक रे (उपकर्णधार), आर्यवीर सेहवाग, आदित्य कुमार, धनंजय सिंग, आदित्य भंडारी, लक्ष्य सांगवान, अतुल्य पांडे, दक्ष द्रल (यष्टीरक्षक), वंश जेटली (यष्टीरक्षक), सक्षम कुमार गेहलोत, धृव चुंबक , अमन चौधरी, शंतनू यादव, शुभम दुबे, दिव्यांश रावत, उद्धव मोहन, लक्ष्मण, परीक्षित सेहरावत.