अझहर, धवन ते हार्दिक पंड्या… या क्रिकेटपटूंनी मैदान गाजवलं, पण संसाराच्या पीचवर फ्लॉप झाले
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  अझहर, धवन ते हार्दिक पंड्या… या क्रिकेटपटूंनी मैदान गाजवलं, पण संसाराच्या पीचवर फ्लॉप झाले

अझहर, धवन ते हार्दिक पंड्या… या क्रिकेटपटूंनी मैदान गाजवलं, पण संसाराच्या पीचवर फ्लॉप झाले

Jan 24, 2025 08:00 PM IST

Inidan Divorced Cricketers : टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटपटूंचे घटस्फोट झाले आहेत. क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूंना आपले नाते टिकवता आले नाही.

अझहर, धवन ते हार्दिक पंड्या… या क्रिकेटपटूंनी मैदान गाजवलं, पण संसाराच्या पीचवर फ्लॉप झाले
अझहर, धवन ते हार्दिक पंड्या… या क्रिकेटपटूंनी मैदान गाजवलं, पण संसाराच्या पीचवर फ्लॉप झाले

भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग आणि आरती अहलावत यांचे २० वर्षांचे लग्न मोडणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. यामुळे क्रिकेट जगताला जबर धक्का बसला आहे. सेहवाग आणि आरती यांचे २००४ मध्ये लग्न झाले होते. वीरू आणि आरती यांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. यामुळे त्यांच्या नात्यात सर्वकाही अलबेल नसल्याचे बोलले जात आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सेहवागच्या कुटुंबातील जवळच्या सूत्रांनी सांगितले, की वीरू आणि आरती अनेक महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. त्यांचे नाते आता खूप वाईट अवस्थेपर्यंत पोहोचले आहे. 

दरम्यान, टीम इंडियाच्या अनेक क्रिकेटपटूंचे घटस्फोट झाले आहेत. क्रिकेटचे मैदान गाजवणाऱ्या या खेळाडूंना आपले नाते टिकवता आले नाही.

मोहम्मद अझरूद्दीन आणि संगिता बिजलानी

माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन याचे वैयक्तिक आयुष्य खूपच वादग्रस्त राहिले आहे. अझरुद्दीनचे पहिले लग्न नौरीनशी झाले होते. या दोघांना असदुद्दीन आणि अयाजुद्दीन अशी दोन मुले आहेत. 

१९९६ मध्ये अझरुद्दीनने नौरीनला घटस्फोट दिला आणि बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानीशी लग्न केले, पण लग्नाच्या १४ वर्षानंतर मोहम्मद अझरूद्दीन आणि संगिता बिजलानी यांचाही घटस्फोट झाला.

मनोज प्रभाकर आणि संध्या

माजी क्रिकेटपटू मनोज प्रभाकर याने याआधी त्याची पहिली पत्नी संध्यासोबत लग्न केले होते. दीर्घ कायदेशीर लढाईनंतर २०१३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. संध्याने मनोजवर हुंडा आणि छळाचे आरोप केले होते. नंतर मनोज प्रभाकरने अभिनेत्री फरहीनशी लग्न केले.

विनोद कांबळी आणि नोएला लुईस

भारताचा माजी फलंदाज विनोद कांबळी याने त्याची बालपणीची मैत्रिण नोएला लुईससोबत लग्न केले होते. २००५  मध्ये या जोडप्याचे ब्रेकअप झाले आणि विनोद कांबळीने नंतर मॉडेल अँड्रिया हेविट हिच्याशी लग्न केले. यासाठी त्याने ख्रिस्ती धर्म स्वीकारला. त्यांना दोन मुलगे आणि एक मुलगी आहे.

दिनेश कार्तिक आणि निकिता वंजारा

विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिक याने त्याची बालपणीची मैत्रीण निकिता वंजारासोबत पहिले लग्न केले. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. पण नंतर निकिताचेटीम इंडियाचा क्रिकेटर मुरली विजयसोबत अफेअर सुरू झाले. यानंतर दिनेश आणि निकिताचा घटस्फोट झाला.

शिखर धवन आणि आयेशा मुखर्जी

शिखर धवन आणि त्याची एक्स पत्नी आयेशा मुखर्जी यांची फेसबुकवर भेट झाली होती. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केले. आयशा आणि शिखर यांना जोरावर धवन हा १० वर्षांचा मुलगा आहे. अनेक वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. आयशा तिच्या मुलासोबत ऑस्ट्रेलियात राहते. २०२३ मध्ये दिल्ली कोर्टाने शिखर धवन आणि आयेशाचा घटस्फोट मंजूर केला.

हार्दिक पंड्या आणि नतासा स्टॅनकोविच

गेल्यावर्षी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या याचा अभिनेत्री नतासा स्टॅनकोविचसोबत घटस्फोट झाला. दोघांनी ३१ मे २०२० ला लग्न केले होते. यानंतर त्याच वर्षी त्यांना अगस्त्य नावाचा मुलगा झाला. त्यानंतर १४ फेब्रुवारी २०२३ रोजी उदयपूर येथे एका भव्य समारंभात जवळचे मित्र आणि कुटुंबीयांच्या उपस्थितीत पुन्हा लग्न केले. पण याच्या एका वर्षानंतरच दोघांचा घटस्फोट झाला.

Whats_app_banner

संबंधित बातम्या