टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली याची एक झलक पाहण्यासाठी चाहते नेहमीच आतुर असतात. कोहली नुकताच बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत खेळताना दिसला होता. आता कोहली भारत-न्यूझीलंड कसोटी मालिकेत दिसणार आहे.
कसोटी मालिकेतील पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर आज बुधवारपासून (१६ ऑक्टोबर) खेळवला जाणार होता, परंतु पावसामुळे सामन्याचे पहिले सत्र खेळ सुरू न होताच संपले.
बेंगळुरूमध्ये पावसाचा जोर कायम आहे, त्यामुळे सामना सुरू होण्यास उशीर होत आहे. अद्याप टॉसही झालेला नाही.
या दरम्यान, सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये विराट कोहली मैदानावर फिरताना दिसत आहे. कोहली बाहेर येताना पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याच्या नावाचा जयघोष केला. यावेळी किंग कोहलीने एका युवा क्रिकेटरला खास भेटही दिली.
व्हिडिओमध्ये विराट कोहली छत्रीखाली छोटी बॅग लटकवत स्टेडियममधून बाहेर पडत असल्याचे दिसून येते. कोहलीसोबत यशस्वी जैस्वालही दिसत आहे. जैस्वालने किट बॅग लटकवलेली दिसत आहेत.
यावेळी, बेंगळुरूमध्ये कोहलीने एका युवा क्रिकेटरला स्वाक्षरी केलेली बॅट दिली. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये कोहली मैदानाच्या मधोमध उभा राहून युवा क्रिकेटरशी बोलताना दिसत आहे. कोहलीशी अशा प्रकारे बोलणे युवा खेळाडूंसाठी खूप फायदेशीर ठरते.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिली कसोटी बेंगळुरू येथे होणार आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने खेळ खराब केला. पहिल्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे पूर्णपणे वाया गेले. बेंगळुरूमध्ये सतत मुसळधार पाऊस सुरू आहे. सामना सुरू होण्याच्या दोन दिवस आधी बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस पडत होता. सामन्याच्या पहिल्याच दिवशी पावसाने खेळ खराब केला.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात १६ ऑक्टोबरपासून तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. पहिला सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होणार आहे. त्यानंतर मालिकेतील दुसरी कसोटी २४ ऑक्टोबरपासून पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवली जाणार आहे. यानंतर मालिकेतील तिसरी आणि शेवटची कसोटी १ नोव्हेंबरपासून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, सर्फराज खान, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, आकाश दीप.
कसोटी मालिकेसाठी न्यूझीलंडचा संघ- टॉम लॅथम (कर्णधार), टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), मायकेल ब्रेसवेल (फक्त पहिली कसोटी), मार्क चॅपमन, डेव्हॉन कॉनवे, मॅट हेन्री, डॅरिल मिशेल, विल ओ'रुर्के, एजाज पटेल, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिचेल सँटनर, बेन सीयर्स, ईश सोढी (केवळ दुसरी आणि तिसरी कसोटी), टीम साऊदी, केन विल्यमसन, विल यंग.
संबंधित बातम्या