Team India : इंट्रा स्क्वॉड सामन्यात कोहली-ऋषभ पंत फ्लॉप, पर्थ कसोटीपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Team India : इंट्रा स्क्वॉड सामन्यात कोहली-ऋषभ पंत फ्लॉप, पर्थ कसोटीपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

Team India : इंट्रा स्क्वॉड सामन्यात कोहली-ऋषभ पंत फ्लॉप, पर्थ कसोटीपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

Nov 15, 2024 12:01 PM IST

Team India Intra Squad match : २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ एक इंट्रा स्क्वाड सामना खेळत आहे, ज्यामध्ये अनुभवी फलंदाजांनी निराशा केली. विराट कोहली, यशस्वी जैस्वाल आणि ऋषभ पंत झटपट बाद झाल्याने भारतीय संघ चिंतेत आहे.

Team India : इंट्रा स्क्वॉड सामन्यात कोहली-ऋषभ पंत फ्लॉप, पर्थ कसोटीपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं
Team India : इंट्रा स्क्वॉड सामन्यात कोहली-ऋषभ पंत फ्लॉप, पर्थ कसोटीपूर्वी टीम इंडियाचं टेन्शन वाढलं

आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ ऑस्ट्रेलियात असून तेथे जोरदार तयारी करत आहे. २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटीपूर्वी टीम इंडियाने शुक्रवारी (१५ नोव्हेंबर) इंट्रा-स्क्वाड सामना खेळला, ज्यामध्ये अनुभवी फलंदाजांनी निराशा केली. यशस्वी जैस्वाल, विराट कोहली आणि ऋषभ पंत झटपट बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतले.

यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहली प्रत्येकी १५ धावा करून बाद झाले, तर यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत १९ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. WACA खेळपट्टीवर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल हे सलामी आले. राहुल लवकरच जखमी होऊन मैदान सोडून गेला.

राहुलच्या उजव्या कोपराला दुखापत झाली आहे. बाऊन्सर खेळताना राहुल अपयशी ठरला आणि त्याच्या कोपराला दुखापत झाली. त्यानंतर फिजिओने राहुलला मैदानाबाहेर नेले. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलला यशस्वी जैस्वालसह सलामीची जबाबदारी स्वीकारावी लागू शकते. मात्र त्याच्या दुखापतीमुळे भारतीय कॅम्पची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत अभिमन्यू ईश्वरनसाठी संघाचे दरवाजे उघडू शकतात.

आगामी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी भारतीय संघासाठी खूप महत्त्वाची असणार आहे. भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवायचा असेल तर त्यांना ऑस्ट्रेलियाचा ४-० असा पराभव करावा लागेल. 

भारतीय संघाला नुकतेच घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ३-० असा क्लीन स्वीपचा सामना करावा लागला, त्यामुळे अंतिम फेरीत पोहोचण्याच्या त्याच्या अपेक्षांना मोठा धक्का बसला.

सरफराज खानच्या कोपराला दुखापत

भारतीय संघ सध्या आपल्या दुखापतींमुळे चिंतेत आहे. याशिवाय कर्णधार रोहित शर्माला पहिल्या कसोटीत खेळणे कठीण आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सरफराज खानच्या कोपराला दुखापत झाली आहे, मात्र ती गंभीर नसल्याचे अहवालात म्हटले आहे. 

 

Whats_app_banner