भारत आणि बांगलादेश यांच्यातील पहिला कसोटी सामना १९ सप्टेंबरपासून चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. सामन्याची तारीख जसजशी जवळ येत आहे, तसतसे दोन्ही संघ आपापल्या तयारीत अधिक व्यस्त होत आहेत.
काही दिवसांपूर्वी रोहित शर्मा नेटमध्ये जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करताना दिसला होता. आता यावेळी बुमराहसमोर विराट कोहली होता, जो 'यॉर्कर किंग'च्या चेंडूंवर सतत बीट होत होता.
चेन्नई कसोटी लाल मातीच्या खेळपट्टीवर खेळवली जाणार आहे. सरावादरम्यान जसप्रीत बुमराह चेंडूला दोन्ही दिशेने स्विंग करताना दिसला. या धारदार गोलंदाजीसमोर चेंडू विराटच्या बॅटच्या काठावर अनेकवेळा आदळला आणि तो अनेकदा बीट झाला. बुमराहने नेट प्रॅक्टिसमध्ये कोहलीची विकेटही काढली.
बुमराहसोबतच ६ फूट ५ इंच उंचीचा गोलंदाज गुरनूर ब्रार यानेही विराट कोहलीसमोर धारदार गोलंदाजी केली. बांगलादेशकडे ६ फुटांपेक्षा जास्त उंचीचा गोलंदाज आहे. त्याने पाकिस्तानी फलंदाजांना अडचणीत आणले होते. त्या गोलंदाजाचे नाव नाहिद राणा असून त्याचा सामना करण्यासाठी टीम इंडियाच्या मॅनेमेंटने गुरनूर ब्रारला बोलावले आहे. त्याची नेट गोलंदाज म्हणून निवड करण्यात आली.
गुरनूर केवळ १५० किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करत नाही तर त्याच्या उंचीमुळे त्याच्या चेंडूंना चांगली उसळीही मिळते. सिमरनजीत आणि गुर्जनप्रीत सिंग या गोलंदाजांनीही कोहलीला अनेकदा बीट केले.