मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat vs Babar Stats : विराट की बाबर, टी-20 क्रिकेटमध्ये खरा किंग कोण? आकडेवारीवरून जाणून घ्या

Virat vs Babar Stats : विराट की बाबर, टी-20 क्रिकेटमध्ये खरा किंग कोण? आकडेवारीवरून जाणून घ्या

Jun 08, 2024 07:58 PM IST

virat kohli vs babar azam stats : भारताने २००७ मध्ये तर पाकिस्तानने २००९ मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. दोन्ही संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. अशा स्थितीत या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहली आणि बाबर आझमवर असतील. दोघेही आपापल्या संघाचे प्रमुख फलंदाज आहेत.

Virat  vs Babar Stats : विराट की बाबर, टी-20 क्रिकेटमध्ये खरा किंग कोण?  आकडेवारीवरून जाणून घ्या
Virat vs Babar Stats : विराट की बाबर, टी-20 क्रिकेटमध्ये खरा किंग कोण? आकडेवारीवरून जाणून घ्या

T20 World Cup 2024 IND vs PAK : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा सर्वात मोठा सामना अर्थातच भारत आणि पाकिस्तान महामुकाबला रविवारी (९ जून) न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. दोन्ही संघ एकमेकांना टक्कर देण्यासाठी सज्ज आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

भारताने २००७ मध्ये तर पाकिस्तानने २००९ मध्ये टी-20 वर्ल्डकप जिंकला होता. दोन्ही संघात अनेक चांगले खेळाडू आहेत. अशा स्थितीत या सामन्यात सर्वांच्या नजरा विराट कोहली आणि बाबर आझमवर असतील. दोघेही आपापल्या संघाचे प्रमुख फलंदाज आहेत.

या दोघांची गणना सध्याच्या काळातील सर्वोत्तम फलंदाजांमध्ये केली जाते. विराट कोहली लवकर आऊट झाला तर भारतासाठी मोठा धक्का असतो. पाकिस्तानची फलंदाजीदेखील बाबरवर अवंलबून असते. तो बाद झाला तर पाकिस्तान खूप कमकुवत होतो. त्यामुळे या सामन्यापूर्वी या दोघांचे रेकॉर्ड काय सांगतात हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे. आम्ही तुम्हाला विराट कोहलीच्या पाकिस्तानविरुद्धच्या रेकॉर्डबद्दल आणि बाबर आझमच्या भारताविरुद्धच्या रेकॉर्डबद्दल सांगणार आहोत.

पाकिस्तानविरुद्ध विराटचे रेकॉर्ड

भारत आणि पाकिस्तान यांच्यात शेवटचा टी-20 सामना २०२२ च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळला होता. तो सामना कोणताच भारतीय चाहता विसरू शकत नाही. तसेच, विराटची त्या सामन्यातील इनिंगही कोणताच क्रिकेट चाहता कधीच विसरू शकणार नाही.

त्या सामन्यात विराटने पाकिस्तानकडून विजय हिसकावून घेतला होता. विराटचा पाकिस्तानविरुद्धचा टी-20 रेकॉर्ड उत्कृष्ट राहिला आहे. त्याने पाकिस्तानविरुद्ध T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात १० सामने खेळले असून ८१.३३ च्या सरासरीने ४८८ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याचा स्ट्राइक रेट १२५.८५  राहिला आहे. त्याच्या बॅटमधूनही ५अर्धशतके आली आहेत.

भारतासमोर बाबर फ्लॉप

पण बाबरची कामगिरी कोहलीच्या तुलनेत पाहिली तर ती खूपच निराशाजनक आहे. टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात बाबर भारताविरुद्ध अपयशी ठरला आहे. त्याने भारताविरुद्ध ४ टी-20 सामने खेळले असून त्यात त्याने केवळ ९२ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी कोहलीच्या तुलनेत खूपच कमी आहे. बाबरची भारताविरुद्धची सरासरी ३०.६६ आहे तर फटकेबाजीच्या बाबतीत तो विराटपेक्षा थोडा पुढे आहे. बाबरचा भारताविरुद्धच्या T20 मध्ये स्ट्राइक रेट १२७.७७ आहे. बाबरने भारताविरुद्ध केवळ १ अर्धशतक झळकावले आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२४