आरसीबीनं ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहली व्हिडीओ कॉलवर काय बोलला? स्मृती मानधनाने सगळंच सांगितलं
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  आरसीबीनं ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहली व्हिडीओ कॉलवर काय बोलला? स्मृती मानधनाने सगळंच सांगितलं

आरसीबीनं ट्रॉफी जिंकल्यानंतर विराट कोहली व्हिडीओ कॉलवर काय बोलला? स्मृती मानधनाने सगळंच सांगितलं

Mar 18, 2024 04:30 PM IST

RCB Won The WPL 2024 : आरसीबी चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहलीने व्हिडिओ कॉल करून महिला संघाचे अभिनंदन केले. आरसीबी महिला संघाच्या विजयाने विराट कोहली खूपच खूश दिसत होता.

Virat Kohli Video Call After RCB Won WPL 2024
Virat Kohli Video Call After RCB Won WPL 2024

Virat Kohli Video Call RCB WPL 2024 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने (RCB) महिला प्रीमियर लीग २०२४ चे (WPL 2024) विजेतेपद जिंकले आहे. WPL च्या अंतिम सामन्यात (WPL 2024 Final ) आरसीबीने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. दिल्ल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना ११३ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात आरसीबीने १९.३ षटकात ११५ धावा करत सामना जिंकला.

आरसीबी चॅम्पियन झाल्यानंतर विराट कोहलीने व्हिडिओ कॉल करून महिला संघाचे अभिनंदन केले. आरसीबी महिला संघाच्या विजयाने विराट कोहली खूपच खूश दिसत होता.

आरसीबीचा पुरुष संघ आयपीएलमध्ये तीनदा फायनलमध्ये पोहोचला होता. पण प्रत्येकवेळी त्यांच्या नशिबी पराभवच आला. यामुळे सोशल आरसीबीला प्रचंड ट्रोल केले जाते. पण आता आरसीबीच्या महिला संघाने कमाल करत पहिली वहिली ट्रॉफी जिंकली आहे.

व्हिडीओ कॉलवर काय बोलणं झालं?

विराट कोहलीशी व्हिडीओ कॉलवर काय बोलणं झालं, याबाबत स्मृती मानधनाने खुलासा केला आहे. विराट कोहली गेल्या १६ वर्षांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग आहे. त्याने आयपीएलमध्ये आरसीबी पुरुष संघासाठी १६ सीझन खेळले आहेत आणि यावेळी तो १७ व्या हंगामासाठी मैदानात उतरणार आहे. मात्र, आरसीबी पुरुष संघाने आजपर्यंत एकही विजेतेपद जिंकलेले नाही. अशा परिस्थितीत महिला संघाने आरसीबीला पहिले जेतेपद मिळवून दिल्यानंतर कोहलीला नक्कीच आनंद झाला आहे.

मानधनाने व्हिडिओ कॉलवरील संभाषणाबद्दल सांगितले की, "मैदानातील गोंगाटामुळे मला विराट भैय्याचा आवाज ऐकू आला नाही. तो खूप आनंदी दिसत होता. तो गेल्या १६-१७ वर्षांपासून फ्रेंचायझीसोबत काम करत आहे. तो याचा एक भाग आहे, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद मला पाहायला मिळाला."

विराट कोहलीच्या व्हिडिओ कॉलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये किंग कोहली डान्स करताना दिसत आहे. आता मंधानाने सांगितले की, विराट कोहली या विजयाने खूप खूश आहे.

यानंतर आता आरसीबीचा पुरुष संघ यंदाच्या आयपीएलमध्ये विजेतेपद मिळवण्याचा पराक्रम करू शकतो की नाही हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

दिल्लीला सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पराभव

मेग लॅनिंगची दिल्ली कॅपिटल्स सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये पोहोचली होती. पण याही वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या वर्षी दिल्लीला मुंबईकडून पराभव पत्करावा लागला होता. तर यंदा आरसीबीने दिल्लीला धुळ चारली आहे.

Whats_app_banner