दिग्गज टेनिस खेळाडू नोव्हाक जोकिवच आणि स्टीव्ह स्मिथ यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यावेळी जोकोविचने विराट कोहलीबाबतही आपली प्रतिक्रिया दिली होती. जोकोविचने विराटचे कौतुक करताना तो महान खेळाडू असल्याचे सांगितले होते.
नोव्हाक जोकोविच म्हणाला होता की, मी गेल्या काही वर्षांपासून विराट कोहलीशी थोडं-थोडं मेसेजेसच्या माध्यमातून बोलत आहे. मात्र, आजतागायत आम्हा दोघांना समोरासमोर भेटण्याची संधी मिळाली नाही.
सर्बियन टेनिस स्टार नोवाक जोकोविच पुढे म्हणाला होता, मी विराट कोहलीचा खूप आदर करतो. विराट कोहलीशी बोलणे आणि त्याचे म्हणणे ऐकणे ही सन्मानाची आणि बहुमानाची बाब आहे.
यानंतर नोव्हाक जोकोविचचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. ऑस्ट्रेलियन ओपनच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला होता.
यानंतर आता या व्हिडीओवर विराट कोहलीने आपली प्रतिक्रिया दिली आहे. बीसीसीआयने विराटचा हा व्हिडीओ पोस्ट केला आहे.
कोहली म्हणाला की, मी आणि तो (जोकोविच) कधीही भेटलो नाही. पण आता आम्ही जेव्हाही भेटू तेव्हा एकत्र चांगला वेळ घालवू. सोबतच, कोहलीने जोकोविचसोबतच्या पहिल्या मेसेजबाबत एक मजेशीर गोष्ट सांगितली आहे.
याआधी जोकोविच आपल्या व्हिडीओत म्हणाला होता की, मी आणि विराट फक्त मेसेजवर बोलतो, यावर विराटने सांगितले की, "मी नोव्हाकचे इंस्टाग्राम प्रोफाईल पाहत होतो. प्रोफाइल पाहता पाहता मी मेसेजच्या ऑप्शनवर क्लीक केले तेव्हा, त्यानेच मला मेसेज केल्याचे दिसले.
माझा विश्वासच बसत नव्हता. सुरुवातीला मला वाटले की ते अकाउंट आहे. यानंतर मी त्याला त्याच्या चांगल्या कामगिरीबाबत शुभेच्छा दिल्या. त्यानेही मला माझ्या ५०व्या वनडे शतकाबाबत माझे अभिनंदन केले'.
संबंधित बातम्या