Ind vs Aus 5th Test Sydney : बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी २०२४-२५ ची पाचवी आणि शेवटची कसोटी सिडनी येथे खेळली जात आहे. सिडनी कसोटीने टीम इंडियाला आतापर्यंत बरेच चढ-उतार दाखवले आहेत. या सामन्यात सर्वात मोठा बदल कर्णधार रोहित शर्माच्या रूपाने पाहायला मिळाला. रोहितला सिडनी कसोटीतून वगळण्यात आले.
आता अचानक सामना संपल्यानंतर विराट कोहलीला कर्णधार बनवण्यात आले. इकडे रोहित बाहेर झाला आणि दुसऱ्या बाजूला विराटला कर्णधारपद मिळाले. चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे संपूर्ण प्रकरण आणि विराट अचानक कर्णधार कसा बनला.
नियमीत कर्णधार रोहित शर्माच्या जागी उपकर्णधार जसप्रीत बुमराहकडे सिडनी कसोटीत भारताची कमान सोपवण्यात आली होती. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी जसप्रीत बुमराह अचानक मैदानाबाहेर गेला. बुमराह बाहेर गेल्यानंतर विराट कोहली कर्णधार म्हणून मैदानावर उपस्थित आहे. अशाप्रकारे रोहित शर्माला वगळल्यानंतर कोहलीला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले.
समालोचन करत असलेले रवी शास्त्री म्हणाले की, बुमराहला स्कॅनसाठी मैदानाबाहेर नेण्यात आले असावे. बुमराह आधी मैदानाबाहेर गेला आणि त्यानंतर सुमारे अर्ध्या तासानंतर तो मेडिकल टीमसोबत स्टेडियममधून बाहेर पडताना दिसला. बुमराह मेडिकल टीम आणि सपोर्ट स्टाफसह कारमधून बाहेर गेला.
बुमराहचे असे बाहेर जाणे ही टीम इंडियासाठी चिंतेची बाब आहे. सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत बुमराहने १० षटके टाकली आहेत, ज्यात त्याने २ बळी घेतले.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव १८१ धावांवर आटोपला. भारताला ४ धावांची आघाडी मिळाली आहे. ऑस्ट्रेलियाकडून ब्यू वेबस्टरने सर्वाधिक ५७ धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज आणि प्रसीध कृष्णाने प्रत्येकी ३ बळी घेतले. जसप्रीत बुमराह आणि नितीश कुमार रेड्डी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. भारताने पहिल्या डावात १८५ धावा केल्या होत्या.
संबंधित बातम्या