IND vs ENG : सेमी फायनल सामन्यांमध्ये कशी आहे कोहलीची कामगिरी? आज इंग्लंडला दणका देणार
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  IND vs ENG : सेमी फायनल सामन्यांमध्ये कशी आहे कोहलीची कामगिरी? आज इंग्लंडला दणका देणार

IND vs ENG : सेमी फायनल सामन्यांमध्ये कशी आहे कोहलीची कामगिरी? आज इंग्लंडला दणका देणार

Jun 27, 2024 11:07 AM IST

india vs england t20 world cup 2024 : विराट कोहली टी-20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये एकदाही फ्लॉप झालेला नाही. प्रत्येक वेळी त्याने उपांत्य फेरीत ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे.

IND vs ENG : सेमी फायनल सामन्यांमध्ये कशी आहे कोहलीची कामगिरी? आज इंग्लंडला दणका देणार
IND vs ENG : सेमी फायनल सामन्यांमध्ये कशी आहे कोहलीची कामगिरी? आज इंग्लंडला दणका देणार (Surjeet Yadav)

virat kohli in semi final matches t20 world cup : टी-20 वर्ल्डकप २०२४ चा दुसरा सेमी फायनल सामना आज (२७ जून) भारत आणि इंग्लंड यांच्यात रंगणार आहे. हा सामना गयाना येथे भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल.

दरम्यान, या वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीची बॅट पूर्णपणे शांत आहे. त्यामुळे त्याच्या फॉर्मची चिंता भारतीय चाहत्यांना आहे. पण अशाीही परिस्थितीत भारताला विराट कोहलीकडून खूप अपेक्षा असतील.

या T20 विश्वचषकात भलेही कोहली फ्लॉप ठरला असेल, पण आजपर्यंत किंग कोहली T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये एकदाही फ्लॉप ठरला नाही.

विराट कोहलीने आतापर्यंत टी-20 विश्वचषकाच्या ३ उपांत्य फेरीत फलंदाजी केली आहे आणि तिन्ही वेळा ५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या वेळी, म्हणजेच २०२२ च्या टी-20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत कोहलीने ४० चेंडूत ५० धावा केल्या होत्या.

त्याआधी, २०१६ च्या T20 विश्वचषकात कोहलीने उपांत्य फेरीत ४७ चेंडूत ८९* धावा केल्या होत्या. किंग कोहलीने २०१४ मध्ये पहिल्यांदा T20 वर्ल्ड कपची सेमीफायनल खेळली होती, त्या सामन्यात त्याने ४४ चेंडूत ७२* धावा केल्या होत्या.

टी-20 वर्ल्डकप सेमी फायनलमध्ये कोहलीची कामगिरी

७२*(४४ चेंडू) धावा - T20 विश्वचषक उपांत्य फेरी २०१४

८९*(४७ चेंडू) धावा - T20 विश्वचषक उपांत्य फेरी २०१६

५० (४० चेंडू) धावा - T20 विश्वचषक उपांत्य फेरी २०२२.

टी-20 विश्वचषक २०२४ मध्ये कोहली फ्लॉप

विराट कोहली २०२४ च्या टी-२० विश्वचषकात आतापर्यंत फ्लॉप दिसला आहे. आतापर्यंत त्याने आपल्या बॅटने एकही अर्धशतक झळकावलेले नाही. कोहलीने आतापर्यंत या स्पर्धेतील ६ डावांमध्ये फलंदाजी केली आहे, ज्यामध्ये तो दोनदा शुन्यावर बाद झाला. ६ डावांमध्ये, कोहलीने ११ च्या सरासरीने आणि १०० च्या स्ट्राइक रेटने ६६ धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या ३७ होती. अशा स्थितीत इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत कोहली कशी कामगिरी करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या