Virat Kohli : कसोटीत २०१९ पर्यंत हिरो असलेला किंग कोहली, २०२० पासून झिरो झाला! जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli : कसोटीत २०१९ पर्यंत हिरो असलेला किंग कोहली, २०२० पासून झिरो झाला! जाणून घ्या

Virat Kohli : कसोटीत २०१९ पर्यंत हिरो असलेला किंग कोहली, २०२० पासून झिरो झाला! जाणून घ्या

Jan 06, 2025 06:42 PM IST

Virat Kohli News : विराट कोहलीसाठी २०११ ते २०१९ हा काळ खूप चांगला राहिला. तो या काळात कसोटीत हिरो म्हणून उदयास आला. पण त्यानंतर २०२० पासून त्याच्यासाठी कसोटीत वाईट दिवस आले. तो या काळात हिरोचा झिरो झाला.

Virat Kohli : कसोटीत २०१९ पर्यंत हिरो असलेला किंग कोहली, २०२० पासून झिरो झाला! जाणून घ्या
Virat Kohli : कसोटीत २०१९ पर्यंत हिरो असलेला किंग कोहली, २०२० पासून झिरो झाला! जाणून घ्या (AFP)

Virat Kohli Hero To Zero In Test : विराट कोहली सध्या खराब फॉर्ममधून जात आहे. नुकत्याच झालेल्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्येही कोहलीची बॅट शांतच राहिली. त्याने फक्त एक शतक झळकावले आणि उरलेल्या ८ डावात फक्त ९० धावा केल्या. 

याआधी कोहली न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेतही फ्लॉप दिसला होता. कोहली २०२० पासून कसोटीत फ्लॉप ठरत आहे.पण २०१९पर्यंत, तो कसोटी फॉरमॅटचा हिरो होता.

विराट कोहली २०११ ते २०१९ पर्यंत 'हिरो'

विराट कोहलीने २०११ ते २०१९ दरम्यान ८४ कसोटी सामने खेळले, ज्यात त्याने ५४.९७ च्या सरासरीने ७२०२ धावा केल्या. या दरम्यान, कोहलीने २७ शतके झळकावली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २५४* धावा आहे.

२०२० पासून विराट कोहली ‘झिरो’

यानतंर विराटने २०२० पासून आतापर्यंत (६ जानेवारी २०२५) आतापर्यंत ३९ कसोटी खेळल्या आहेत. या सामन्यांमध्ये त्याने केवळ ३०.७२ च्या सरासरीने २०२८ धावा केल्या. या दरम्यान त्याने केवळ ३ शतके झळकावली, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या १८६ धावा आहे. म्हणजेच २०२० पासून कोहलीची कसोटीतील सरासरी जवळपास निम्म्यावर आली आहे.

अशाप्रकारे २०११ ते २०१९ हा काळ विराटसाठी खूपच छान होता. यानंतर कोहली कसोटीत सतत फ्लॉप होताना दिसत आहे. आता कोहली कसोटी फॉरमॅटमध्ये कधी पुनरागमन करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

विराट कोहलीची कसोटी कारकीर्द

विराट कोहलीने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत १२३ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या २१० डावांमध्ये फलंदाजी करताना कोहलीने ४६.८५ च्या सरासरीने ९२३० धावा केल्या आहेत. या दरम्यान, त्याने ३० शतके आणि ३१ अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या २५४* धावा आहे.

कोहलीने कसोटीत आतापर्यंत ३० षटकार आणि १०२७ चौकार मारले आहेत. कोहलीने जून २०११ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. कसोटी पदार्पण करण्यापूर्वी किंग कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रवेश केला होता.

Whats_app_banner

संबंधित बातम्या