dean elgar and virat kohli fight : दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार डीन एल्गर सध्या चर्चेत आला आहे. एल्गर गेल्याच महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. पण आता त्याने एका मुलाखतीत विराट कोहली आणि त्याच्या पहिल्या भेटीचा आणि वादाचा खुलासा केला आहे.
एल्गर आणि कोहलीची पहिली भेट २०१५ मध्ये झाली होती. त्या मालिकेत दोन्ही खेळाडूंमध्ये खूप तणावाचे वातावरण होते, दोघांनीही एकमेकांना बऱ्याच शिव्या घातल्या होत्या. आफ्रिकेतील एका पॉडकास्टमध्ये बोलताना डीन एल्गरने हा किस्सा सांगितला आहे. आता खुलाशानंतर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
डीन एल्गरने सांगितले की, आम्ही भारत दौऱ्यावर होतो आणि त्या दौऱ्यात खेळपट्टीवरुन बरेच विनोद केले जात होते. मी जेव्हा फलंदाजीस आलो तेव्हा अश्विन गोलंदाजी करत होता आणि मला माझी फलंदाजीतील लय कायम ठेवायची होती. पण त्यावेळी रविंद्र जडेजा आणि कोहलीने माझ्या दिशेने थुंकले'.
एल्गर पुढे म्हणाला की, "मग मी कोहलीला म्हणालो कि, जर तू पुन्हा असे केलेस तर मी तुला याच मैदानावर बॅटने फोडून काढीन. यानंतर तो म्हणाला (कोहली), तु चुकीच्या ठिकाणी आणि व्यक्तीला बोलत आहेस. यानंतर एल्गर शांत झाला कारण ते भारतात होते, त्यामुळे त्यांनी थोडीशी सावधगिरी बाळगल्याचे एल्गरने सांगितले.
यानंतर जेव्हा मुलाखत घेणाऱ्याने विचारले की, त्याला (कोहलीला) तुझी भाषा समजली का? यावर एल्गर म्हणाला, हो कारण एबी डिव्हिलियर्य त्यावेळी आरसीबीकडूनच खेळायचा."
डीन एल्गर पुढे म्हणाला, "यानंतर कोहलीने माझ्यासोबत नेमके काय केले हे डिव्हिलियर्सला कळले, तेव्हा एबीडी कोहलीकडे गेला आणि त्याला विचारले, "तू माझ्या टीममेटवर का थुंकत आहेस?
यानंतर दोन वर्षांनी, भारतीय संघ २०१७-१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आला तेव्हा कोहलीने मला फोन केला आणि मालिकेतनंतर माझ्यासोबत ड्रिंक्स घेण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावेळी तो म्हणाला होता, की त्याला त्याच्या कृत्याबद्दल माफी मागायची आहे."
"आम्ही मालिकेनंतर भेटलो आणि ३ वाजेपर्यंत प्यायलो, आणि हो, ही माझी कोहलीसोबतची पहिली भेट होती" असे म्हणत एल्गरने आपल्या कथेचा शेवट केला.