भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीगचा थरार सुरू आहे. आयपीएल २०२४ नंतर टी-20 वर्ल्डकप होणार आहे. त्यामुळे वर्ल्डकपच्या दृष्टीने यंदाचे आयपीएल अतिशय महत्वाचे आहे. आयपीएलमधील कामगिरीच्या आधारेच टीम इंडियाचा टी-20 वर्ल्डकपचा संघ ठरवला जाणार आहे.
त्यामुळे या आयपीएलमध्ये टीम इंडियाचे वरिष्ट खेळाडूंसह युवा खेळाडूही अतिशय दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करत आहेत. टीम इंडियाचा अमुभवी फलंदाज विराट कोहलीही खोऱ्याने धावा काढत आहे.
पण चाहते आणि काही क्रिकेट एक्सपर्ट कोहलीच्या स्ट्राईक रेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. विशेष म्हणजे, कोहलीने राजस्थान रॉयल्सविरुद्ध ६७ चेंडूत शतक केले. हे आयपीएलचे सर्वात संथ शतक ठरले. यानंतर कोहलीची टीम इंडियाच्या टी-20 संघात जागा बनत नाही, असे बोलले जात आहे.
पण आता महान खेळाडू ब्रायन लारा विराट कोहलीच्या बचावात उतरला आहे. लाराने कोहलीचा स्ट्राइक चांगला असल्याचे म्हटले आहे आणि त्याला टी-20 वर्ल्डकपमध्ये स्थानदेखील मिळाले पाहिजे, असेही लाराने म्हटले आहे.
ब्रायन लारा म्हणाला, की 'स्ट्राईक रेट सामन्याच्या परिस्थितीवर अवलंबून असतो आणि सलामीच्या फलंदाजांचा स्ट्राइक रेट १३०-१४० असेल तर ते खूप चांगले आहे. आयपीएलमध्ये कशी बॅटिंग होत आहे हे आपण बघतो आहोत. अशा परिस्थितीत जर तुम्ही मधल्या फळीत फलंदाजीला आलात तर तुमचा स्ट्राइक रेट १५०-१६० असला पाहिजे.
लारा पुढे म्हणाला की, ‘कोहलीबद्दल बोलायचे झाले तर तो सलामीवीर म्हणून १३० च्या स्ट्राइक रेटने खेळतो आणित्याचा इनिंग १६० च्या स्ट्राइक रेटवर संपवतो, जे खूप चांगले आहे. जर तुम्ही माझ्याशी T20 विश्वचषकातील भारताच्या टॉप ऑर्डरमधील फलंदाजांबद्दल बोलाल तर मला त्यात रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांची नावे घ्यायला आवडेल."
संबंधित बातम्या