विराट कोहली हा सध्याचा क्रिकेटमधील सर्वात मोठा स्टार आहे. टीम इंडिया सामना असो किंवा नसो, पण विराट कोहली नेहमी चर्चेत असतो. कोहली काही ना काही कारणामुळे सोशल मीडियापासून ते गुगलपर्यंत सर्वत्र ट्रेंडमध्ये राहतो.
अशा स्थितीत गुगलने नुकतीच आशियातील सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींची यादी जाहीर केली आहे. ज्यामध्ये विराट कोहलीचे नाव टॉप ५ मध्ये आहे.
विराट कोहलीचे नाव ऐकताच करोडो क्रिकेट चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात. त्याची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. गुगलने एक यादी जारी केली आहे. यामध्ये आशियातील टॉप ५ सर्वाधिक सर्च केलेल्या सेलिब्रिटींची नावे आहेत आणि या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे.
तसेच, विराट कोहलीची लोकप्रियता आणखी वाढण्याची शक्यता आहे. कारण २२ नोव्हेंबरपासून ऑस्ट्रेलियात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीला सुरुवात होत आहे. ज्यामध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. विराट कोहलीचा ऑस्ट्रेलियन खेळपट्ट्यांवर चांगला रेकॉर्ड आहे.
गुगलने जारी केलेल्या आकडेवारीनुसार २०२४ मध्ये आशियातील सर्वाधिक सर्च केलेल्या लोकांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिले स्थान पटकावले आहे.
या यादीत विराट कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. विशेष म्हणजे या यादीत शाहरुख खाननेही आपले स्थान निर्माण केले असून तो पाचव्या क्रमांकावर आहे. याशिवाय के-पॉप सुपरस्टार व्ही आणि बीटीएसचे जंगकूक यांचाही या यादीत समावेश असून ते तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
पहिला सामना, २२ ते २६ नोव्हेंबर, पर्थ.
दुसरा सामना, ६ ते १० डिसेंबर, एडलेड ओव्हल, (डे-नाईट).
तिसरा सामना, १४ ते १८ डिसेंबर, गाबा.
चौथा सामना, २६ ते ३० डिसेंबर, मेलबर्न.
पाचवा सामना, ३ ते ७ जानेवारी, सिडनी.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारताचा संघ: रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इसवरन, शुभमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराज खान, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.