Virat Kohli withdraws from first two Tests : भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाने तयारीसुद्धा सुरू केली आहे. पण आता टीम इंडियाचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून बाहेर झाला आहे.
विराट कोहलीने वैयक्तिक कारणांमुळे पहिल्या दोन सामन्यांमधून आपले नाव मागे घेतले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) विराट कोहलीने दोन कसोटीतून आपले नाव मागे घेतल्याची माहिती दिली. बीसीसीआयने विराट कोहली बाबत एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे, यामध्ये विराटच्या न खेळण्यामागचे कारण सांगण्यात आले आहे.
बीसीसीआयने सांगितले की, “वैयक्तिक कारणांचा हवाला देत विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांमधून ब्रेक देण्याची विनंती केली आहे. विराटने कर्णधार रोहित शर्मा, टीम मॅनेजमेंट आणि निवड समितीशी बोलून हा निर्णय घेतला आहे.”
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ: रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, एस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.
पहिली कसोटी- २५-२९ जानेवारी, हैदराबाद
दुसरी कसोटी- २-६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम
तिसरी कसोटी- १५-१९ फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी- २३-२७ फेब्रुवारी, रांची
पाचवी कसोटी- ७-११ मार्च, धरमशाला
संबंधित बातम्या