मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  T20 World Cup 2024 : रोहित-विराट टी-20 विश्वचषक खेळणार, ३० खेळाडूंवर असेल आगरकरची नजर

T20 World Cup 2024 : रोहित-विराट टी-20 विश्वचषक खेळणार, ३० खेळाडूंवर असेल आगरकरची नजर

Rohit Bibhishan Jetnavare HT Marathi
Jan 03, 2024 11:50 AM IST

Rohit Sharma Virat Kohli t20 world cup 2024 : टीम इंडियाच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी यावर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकात खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

Rohit Sharma Virat Kohli
Rohit Sharma Virat Kohli (REUTERS)

Virat Kohli-Rohit Sharma will play T20 World Cup 2024 : विराट कोहली आणि रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या दोन्ही खेळाडूंनी यावर्षी जूनमध्ये होणारा टी-20 वर्ल्डकप खेळण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रोहित आणि विराट ११ जानेवारीपासून सुरू होणारी अफगाणिस्तानविरुद्धची टी-20 मालिकाही खेळाडू शकतात.

टीम इंडियाचा चीफ सिलेक्टर अजित आगरकर सध्या आफ्रिकेतच आहे, आणि तो केपटाऊन कसोटीला उपस्थित राहणार आहे. अफगाणिस्तान मालिकेसाठी संघ जाहीर करण्याआधी आगरकर विराट आणि रोहितशी चर्चा करणार आहे.

दरम्यान, विराट आणि रोहित शर्मा यांनी त्यांचा शेवटचा टी-20 सामना २०२२ च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये खेळला होता. इंग्लंडविरुद्धच्या त्या सेमी फायनलमध्ये भारताचा पराभव झाला होता. 

आता विराट आणि रोहितची फिटनेस आणि आयपीएलमधील फॉर्म यावरून दोघांची वर्ल्डकपसाठी निवड होते, की त्यांना थेट वर्ल्डकप संघात प्रवेश मिळतो, हे पाहण्यासारखे असेल. टी-20 वर्ल्डकप २०२४ जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळला जाणार आहे.

विशेष म्हणजे, आता अशी माहिती समोर आली आहे की, भारतीय निवड समिती आयपीएलमध्ये २५ ते ३० खेळाडूंवर नजर ठेवून असेल. या खेळाडूंना त्यांच्या कामगिरीच्या आधारे वर्ल्डकपचे तिकिट मिळेल.

WhatsApp channel