मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli : श्री राम भक्त कोहली! रामाचं गाणं वाजताच विराटनं चालवला बाण आणि हातही जोडले, पाहा

Virat Kohli : श्री राम भक्त कोहली! रामाचं गाणं वाजताच विराटनं चालवला बाण आणि हातही जोडले, पाहा

Jan 03, 2024 08:26 PM IST

Virat Kohli Reaction On Ram Siya Ram Song : आफ्रिकेच्या पहिल्या डावातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विराट कोहली वेगळ्याच मुडमध्ये दिसत आहे.

virat kohli reaction on ram siya ram song
virat kohli reaction on ram siya ram song

टीम इंडिया आज (३ जानेवारी) केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसरी कसोटी खेळत आहे. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. त्यामुळे आफ्रिकेचा पहिला डाव अवघ्या ५५ धावांत आटोपला.

ट्रेंडिंग न्यूज

यानंतर आफ्रिकन गोलंदाजांनी भारताला १५३ धावांवर रोखले. आता आफ्रिकेचा दुसरा डाव खेळला जात आहे. विशेष म्हणजे कसोटी सामन्याचा हा पहिलाच दिवस आहे.

दरम्यान, आफ्रिकेच्या पहिल्या डावातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत विराट कोहली वेगळ्याच मुडमध्ये दिसत आहे.

वास्तविक, पहिल्या डावात विराट कोहली राम सिया राम या गाण्यावर डान्स करताना दिसला.

खरं तर, दक्षिण आफ्रिकेचा केशव महाराज जेव्हा जेव्हा बॅटिंग किंवा बॉलिंगसाठी येतो, तेव्हा मैदानातील डीजे 'राम सिया राम' गाणं वाजवतात. या सामन्यातही असेच घडले. केशव महाराज फलंदाजीसाठी मैदानावर येताच, हे गाणं वाजवण्यात आलं.

त्यानंतर हे गाणे ऐकून विराट कोहली स्वत:ला रोखू शकला नाही आणि त्याने मैदानावर बाण मारण्याची अॅक्शन केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

केएल राहुलनं केशव महाराजला विचारलं होतं

याच दौऱ्यातील एकदिवसीय मालिकेतील एका सामन्यादरम्यान केएल राहुलने केशव महाराजला या गाण्याबाबत विचारले होते. राहुल म्हणाला होता की, तु जेव्हा जेव्हा फलंदाजीला किंवा गोलंदाजीला येतो तेव्हा डीजे हे गाणे वाजवतो. यावर केशवने हो म्हणून उत्तर दिले होते. या प्रसंगाचा व्हिडीओदेखील व्हायरल झाला होता.

भारताला केपटाऊनमध्ये सामना जिंकण्याची संधी

केपटाऊनच्या न्यू लॅंड्स स्टेडियमवर टीम इंडियाचा रेकॉर्ड खूपच खराब राहिला आहे. येथे भारतीय संघाने आतापर्यंत ६ कसोटी सामने खेळले असून त्यापैकी ४ सामने गमावले आहेत. तर २ सामने अनिर्णित राहिले आहेत. भारताने केपटाऊनमध्ये एकही कसोटी सामना जिंकलेला नाही. पण आता भारताकडे इतिहास रचण्याची संधी आहे.

दोन्ही प्लेइंग इलेव्हन

भारत- रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिध कृष्णा, मुकेश कुमार.

दक्षिण आफ्रिका- डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, टोनी डी जोर्जी, ट्रिस्टन स्टब्स, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरे (यष्टीरक्षक

टी-२० वर्ल्डकप २०२४