भारतीय क्रिकेट संघाचा तगडा खेळाडू विराट कोहली १२ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीचा सामना खेळणार आहे. दिल्लीचा शेवटचा गट सामना रेल्वेशी होणार आहे. या सामन्यासाठी विराट कोहली मंगळवारी (२८ जानेवारी) सकाळी ठीक ९ वाजता काळ्या रंगाच्या पोर्श कारमधून अरुण जेटली फिरोजशाह कोटला मैदानावर पोहोचला. कोहलीची गाडी 'वीरेंद्र सेहवाग गेट'मधून आत शिरली.
यानंतर विराट १२ वर्षांहून अधिक काळ लोटल्यानंतर आपल्या प्रथम श्रेणी संघासोबत सराव करण्यासाठी फिरोजशाह कोटला मैदानात आला. विराट कोहली स्टेडियममध्ये आल्यावर त्याच्या स्वागतासाठी विशेष तयारी करण्यात आली होती. विशेषत: विराट कोहलीच्या जेवणाची पूर्ण काळजी घेण्यात आली.
विराट कोहलीला छोले-भटोरे खूप आवडतात. या कारणास्तव डीडीसीएने त्याच्यासाठी खास छोले-भटोरेची ऑर्डर दिली होती. मात्र, फिटनेस लक्षात घेऊन विराटने छोले-भटोरे खाल्ले नाहीत.
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या (DDCA) वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, 'विराटमध्ये बदल झालेला नाही. त्याला छोले-भटुरे आवडतात यामुळे आम्ही त्याच्यासाठी ऑर्डर केली होती. पण तो म्हणाला, 'मी छोले-भटुरे खाणार नाही.'
विराटने सराव सत्रानंतर त्याच्या जुन्या सवयीप्रमाणे करी आणि भात खाल्ला. ही देखील विराटची आवडती डीश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच, विराटचा सराव पाहण्यासाठी चाहत्यांनीही बरीच गर्दी केली होती. प्रशिक्षक सरनदीप आणि बंटू संपूर्ण वेळ विराट आणि संघासोबत घालवला.
वेगवान गोलंदाज नवदीप सैनी वगळता, दिल्ली संघातील इतर सर्व १८ सदस्यांनी विराटला फक्त टीव्हीवर पाहिले होते आणि 'चिकू' भारतीय क्रिकेटचा 'किंग' कसा बनला याच्या कथा ऐकत मोठे झाले. आता हे खेळाडू पहिल्यांदाच विराटला भेटले.
संबंधित बातम्या