Virat Kohli : किंग कोहलीच्या करिअरचा अंत जवळ! ॲलन बॉर्डर असं का म्हणाले? जाणून घ्या
मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  Virat Kohli : किंग कोहलीच्या करिअरचा अंत जवळ! ॲलन बॉर्डर असं का म्हणाले? जाणून घ्या

Virat Kohli : किंग कोहलीच्या करिअरचा अंत जवळ! ॲलन बॉर्डर असं का म्हणाले? जाणून घ्या

Dec 17, 2024 10:38 AM IST

Virat Kohli Gabba Test : २०२४ च्या सुरुवातीपासून विराट कोहलीचा खराब फॉर्म कायम आहे. आता एका महान क्रिकेटपटूने विराटच्या करिअरचा शेवट जवळ आल्याचे म्हटले आहे.

Virat Kohli : किंग कोहलीच्या करिअरचा अंत जवळ! ॲलन बॉर्डर असं का म्हणाले? जाणून घ्या
Virat Kohli : किंग कोहलीच्या करिअरचा अंत जवळ! ॲलन बॉर्डर असं का म्हणाले? जाणून घ्या (AFP)

विराट कोहलीसाठी २०२४ हे वर्ष जवळपास सर्वच बाबतीत अत्यंत वाईट ठरले आहे. आता बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीदरम्यान महान क्रिकेटपटू ॲलन बॉर्डर यांनी कोहलीबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

ब्रिस्बेन कसोटीत कोहली ऑफ स्टंप बाहेरील चेंडू खेळून बाद झाला होता. ॲलन बॉर्डर यांच्या मते, कोहली आता ते चेंडू खेळण्याचा प्रयत्न करत आहे, जे तो सहसा सोडून देतो. याचे कारण देताना बॉर्डर म्हणालेकी कोहली एकतर मानसिकदृष्ट्या स्वस्थ नाही किंवा त्याची कारकीर्द अंतिम टप्प्यात पोहोचली आहे.

एका ऑस्ट्रेलियन मीडिया चॅनलच्या वृत्तानुसार, ॲलन बॉर्डर म्हणाले, "कोहली ब्रिस्बेनमध्ये ज्या प्रकारे आऊट झाला ते वाईट आहे. जर तो चांगल्या फॉर्ममध्ये असता त्याने असे चेंडू सोडून दिले असते. विराट मानसिकदृष्ट्या सध्या ठीक आहे की नाही हे मला माहीत नाही. पम आता त्याच्याकडे पूर्वीची कौशल्ये आणि भूक राहिली नाही."

दरम्यान, विराट कोहली हा सातत्याने सारख्याच पद्धतीने बाद होत आहे. ऑफ स्टंपच्या बाहेरील चेंडूला मारून तो स्वतःला अडचणीत आणत आहे.

कोहलीने त्याची लय गमावली

ॲलन बॉर्डर यांच्यानतंर इंग्लंडचा दिग्गज खेळाडू मायकेल वॉन यानेही विराट कोहलीसाठी असेच वक्तव्य केले आहे.

मायकेल वॉन म्हणाला की, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड, जिथे चेंडूची मुव्हमेंट आणि बाउन्स दिसून येतो अशा ठिकाणी विराट ऑफ स्टंपच्या बाहेरचे चेंडू सोडून देतो.

पण आता बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये विराट कोहली बहुतेक वेळा अशा चेंडूंवर बाद झाला आहे जे तो सोडून देऊ शकला असता. मायकेल वॉन म्हणाला, "मला वाटते की त्याने त्याचा टच पूर्णपणे गमावला आहे."

Whats_app_banner